आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
केंद्रीय मंत्रिमंडळाची 2022-23 हंगामासाठी कच्च्या तागाच्या (ज्यूट) किमान आधारभूत किंमतीला मंजूरी
Posted On:
22 MAR 2022 3:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मार्च 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार संबंधित मंत्रिमंडळ समितीने आज 2022-23 च्या हंगामासाठीता कच्च्या तागासाठी (ज्यूट) किमान आधारभूत किंमतीला (एमएसपी) मंजूरी दिली. कृषी खर्च आणि मूल्य आयोगाच्या शिफारशींवर आधारित मंजूरी देण्यात आली आहे.
कच्च्या तागाचा एमएसपी (टीडीएन3 समतुल्य टिडी 5 श्रेणी) 2022-23 हंगामासाठी 4750/- रुपये प्रति क्विंटल इतका निश्चित करण्यात आला आहे. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रति क्विंटल 250/- रुपये इतकी आहे. यामुळे संपूर्ण भारतातील सरासरी उत्पादन खर्चापेक्षा 60.53 टक्के परतावा मिळेल. 2022-23 हंगामासाठी कच्च्या तागाचा घोषित एमएसपी हा सरकारने 2018-19 च्या अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट एमएसपी निश्चित करण्याच्या तत्त्वाशी सुसंगत आहे.
हे नफ्याच्या प्रमाणात किमान 50 टक्के हमी देते. ताग उत्पादकांना चांगला मोबदला मिळवून देण्यासाठी आणि दर्जेदार तागाला प्रोत्साहन देण्यासाठी हे एक महत्त्वाचे आणि प्रगतीशील पाऊल आहे.
भारतीय ताग महासंघ (ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ही केंद्र सरकारची मूल्य आधारभूत केंद्रीय नोडल एजन्सी म्हणून कार्य सुरू ठेवेल आणि यात जर काही नुकसान झाले तर केंद्र सरकारकडून त्याची पूर्ण भरपाई केली जाईल.
S.Thakur/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1808182)
Visitor Counter : 271
Read this release in:
Tamil
,
Kannada
,
Manipuri
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Malayalam