माहिती आणि प्रसारण मंत्रालय
दूरदर्शनच्या बातम्या आता दिसणार ऑस्ट्रेलियात
Posted On:
21 MAR 2022 7:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मार्च 2022
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील परस्पर मैत्रीपूर्ण संबंध अधिक बळकट करण्यासाठी प्रसारण क्षेत्रातील सहकार्याला चालना देण्याकरिता भारताची सार्वजनिक प्रसारक प्रसार भारतीने 21 मार्च 2022 रोजी ऑस्ट्रेलियाच्या सार्वजनिक सेवा प्रसारक स्पेशल ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस (SBS) सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
यामुळे ऑस्ट्रेलियातील भारतीय लोकांना डीडी न्यूज, डीडी इंडिया आणि डीडी न्यूजच्या विविध भाषा सेवा उपलब्ध होतील. या सामंजस्य कराराद्वारे, विविध शैलींमधील कार्यक्रमांच्या सह-निर्मिती आणि संयुक्त प्रसारणाच्या संधी दोन्ही प्रसारकांना गवसतील. ते संस्कृती, शिक्षण, विज्ञान, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, प्रवास, संगीत आणि कला या क्षेत्रातील कार्यक्रमांची (रेडिओ आणि दूरदर्शन सामग्री) देवाणघेवाण करतील.
दोन्ही सार्वजनिक प्रसारक व्यावसायिकांची देवाणघेवाण करतील आणि तांत्रिक ज्ञान आणि कार्यक्रम निर्मिती इत्यादींबद्दलचे ज्ञान सामायिक करण्यासाठी त्यांचे प्रशिक्षण आयोजित करतील. ते एकमेकांना माहितीचा पुरवठा आणि इतर संस्थात्मक आणि तांत्रिक सहाय्यासह सुविधा आणि सामान्य सहाय्य प्रदान करतील.
भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी या सामंजस्य करारावर पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, “यामुळे कार्यक्रमांची देवाणघेवाण, या क्षेत्रातील कौशल्ये आणि ऑस्ट्रेलियातील दूरदर्शन वाहिन्यांवर डीडी इंडिया, डीडी न्यूज आणि डीडी सह्याद्री यांच्या दैनंदिन प्रसारणासाठी वेळ उपलब्ध होईल.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1807838)
Visitor Counter : 283