गृह मंत्रालय
राष्ट्रपती भवनात आज होणाऱ्या नागरी सन्मान समारंभ-1 मध्ये राष्ट्रपती राम नाथ कोविंद वर्ष 2022 साठीचे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान करणार
Posted On:
21 MAR 2022 1:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मार्च 2022
राष्ट्रपती राम नाथ कोविंद आज राष्ट्रपती भवनात होणाऱ्या नागरी सन्मान समारंभ- I मध्ये वर्ष 2022 साठीचे दोन पद्मविभूषण, आठ पद्मभूषण आणि 54 पद्मश्री पुरस्कार प्रदान करतील. आजच्या समारंभात राधे श्याम आणि जनरल बिपिन रावत (मरणोत्तर) यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल. गुलाम नबी आझाद, गुरमीत बावा (मरणोत्तर), एन. चंद्रशेखरन, देवेंद्र झाझरिया, राशीद खान, राजीव महर्षी, डॉ. सायरस पूनावाला आणि सच्चिदानंद स्वामी यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान केले जातील. नागरी सन्मान समारंभ -II 28 मार्च रोजी होणार आहे.
पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातात. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखा /कार्यक्षेत्रात हे पुरस्कार दिले जातात. 'पद्मविभूषण' हा पुरस्कार उल्लेखनीय आणि अतुलनीय सेवेसाठी दिला जातो. उच्च श्रेणीतील अतुलनीय सेवेसाठी ‘पद्मभूषण’ आणि कोणत्याही क्षेत्रातील अतुलनीय सेवेसाठी ‘पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येते. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी या पुरस्कारांची घोषणा केली जाते.
राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातात. या वर्षी एकूण 128 पद्म पुरस्कार प्रदान केले जात आहेत, यात दोन पुरस्कार विभागून दिले जाणार आहेत (दोन व्यक्तींना पुरस्कार असला तरी तो एक पुरस्कार गणला जातो). यंदाच्या पुरस्कार विजेत्यांच्या यादीत चार पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश असून यापैकी 34 महिला आहेत. या यादीमध्ये परदेशी/एन आर आय /पी आय ओ /ओ सी आय या श्रेणीतील 10 व्यक्ती आहेत आणि 13 जणांना मरणोत्तर पुरस्कार दिला जाणार आहे.
Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1807583)
Visitor Counter : 258
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada