आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत 181.24 कोटीहून अधिक मात्रा देण्यात आल्या
12-14 वयोगटातील किशोरांना गेल्या 24 तासात लसीच्या सुमारे 18 लाख मात्रा देण्यात आल्या
भारताच्या उपचाराधीन रुग्णसंख्येत 25,106 पर्यंत घट; देशातील एकूण पॉझीटीव्ह रुग्णसंख्येच्या 0.06%
गेल्या 24 तासात देशात 1,549 नव्या रुग्णांची नोंद
रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.74%
साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 0.40%
Posted On:
21 MAR 2022 12:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मार्च 2022
राष्ट्रव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाअंतर्गत लसीच्या आतापर्यंत 181.24 कोटीपेक्षा जास्त (1,81,24,97,303) मात्रा देण्यात आल्या. सकाळी 7 वाजेपर्यंत हाती आलेल्या तात्पुरत्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 2,14,03,116 सत्राद्वारे हे लसीकरण करण्यात आले आहे.
12-14 वर्षे वयोगटातल्या किशोरांसाठी 16 मार्च 2022 ला लसीकरण सुरु झाले. गेल्या 24 तासात सुमारे 18 लाख (17,99,684) किशोरांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे
Cumulative Vaccine Dose Coverage
|
HCWs
|
1st Dose
|
1,04,03,046
|
2nd Dose
|
99,90,717
|
Precaution Dose
|
43,59,722
|
FLWs
|
1st Dose
|
1,84,12,172
|
2nd Dose
|
1,74,89,088
|
Precaution Dose
|
66,66,494
|
Age Group 12-14 years
|
1st Dose
|
17,99,684
|
Age Group 15-18 years
|
1st Dose
|
5,62,15,365
|
2nd Dose
|
3,55,29,066
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
55,37,95,114
|
2nd Dose
|
45,95,63,393
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
20,26,14,621
|
2nd Dose
|
18,38,06,629
|
Over 60 years
|
1st Dose
|
12,66,44,476
|
2nd Dose
|
11,44,84,897
|
Precaution Dose
|
1,07,22,819
|
Precaution Dose
|
2,17,49,035
|
Total
|
1,81,24,97,303
|
भारतात उपचाराधीन रुग्णसंख्येचा घटता कल कायम राखत या संख्येत आणखी घट होऊन ती आज 25,106 झाली आहे. देशाच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णसंख्येच्या ती 0.06% आहे.
परिणामी रुग्ण बरे होण्याचा देशाचा दर 98.74% झाला आहे. गेल्या 24 तासात 2652 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत (देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून) कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,24,67,774 झाली आहे.
गेल्या 24 तासात देशात 1,549 नव्या रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासांत देशात 3,84,499 कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 78.30 कोटीहून अधिक (78,30,45,157) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशभरात दैनंदिन आणि साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दरात सातत्याने घट होत आहे. रुग्ण बरे होण्याचा साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 0.40% आणि दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 0.40% आहे.
S.Thakur/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1807519)
Visitor Counter : 241