वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

चालू आर्थिक वर्षात गव्हाच्या निर्यातीत विक्रमी वाढ लक्षात घेत अपेडाने भारताच्या गहू निर्यातीला चालना देण्यासाठी केले बैठकीचे आयोजन


जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्यय टाळण्यासाठी मालवाहतूक वाढवण्याचा वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा सल्ला

Posted On: 19 MAR 2022 9:48PM by PIB Mumbai

 

चालू आर्थिक वर्षात गव्हाच्या निर्यातीत झालेल्या विक्रमी वाढीच्या पार्श्वभूमीवर, कृषी आणि अन्न प्रक्रिया उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) मोठ्या प्रमाणात मालवाहतुकीची क्षमता असलेल्या देशांमध्ये निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी नुकतीच मूल्य साखळीतील प्रमुख हितधारकांची बैठक आयोजित केली होती.

17 मार्च 2022 रोजी झालेल्या या बैठकीत भू-राजकीय परिस्थिती लक्षात घेता जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्यय दूर करण्याकरिता मालवाहतूक वाढवण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या निर्देशांचे पालन करण्यात आले.

गुरुवारची बैठक अपेडा चे अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथु यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि त्यात व्यापारी, निर्यातदार, बंदर अधिकारी, अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालय, रेल्वे मंत्रालय आणि विविध राज्य सरकारांचे अधिकारी यासारख्या प्रमुख हितधारकांचा सहभाग होता.

या बैठकीत, रेल्वेने अतिरिक्त गव्हाच्या वाहतुकीची कोणतीही त्वरित मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसे रेक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. बंदर प्राधिकरणांना गव्हासाठी समर्पित कंटेनरसह समर्पित टर्मिनल वाढवण्यास सांगितले आहे.

गव्हाच्या भरघोस उत्पादनाचा अंदाज पाहता, अपेडाने सर्व हितधारकांना विनासायास गहू निर्यात सुलभ करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करण्यास सांगितले आहे.

एप्रिल ते जानेवारी 2021-22 या कालावधीत गव्हाच्या निर्यातीत 1742 दशलक्ष अमेरिकी डॉलर इतकी मोठी वाढ नोंदवली गेली, जी 2020-21 मधील याच कालावधीच्या तुलनेत 387 टक्क्यांनी वाढून 340.17 दशलक्ष अमेरिकी डॉलर झाली.

चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या दहा महिन्यांसह गेल्या तीन वर्षांत भारताने 2352.22 दशलक्ष अमेरिकी डॉलर किमतीची गहू निर्यात नोंदवली आहे. 2019-20 मध्ये, गव्हाची निर्यात USD 61.84 दशलक्ष होती जी 2020-21 मध्ये USD 549.67 दशलक्ष झाली.

जागतिक व्यापारात भारत हा गहू निर्यात करणार्‍या पहिल्या दहा देशांपैकी नसला तरी, निर्यातीतील वाढीचा दर इतर देशांच्या तुलनेत वाढला आहे, जो जगभरातील नवीन बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यात भारत वेगाने प्रगती करत असल्याचे दर्शवतो.

इजिप्तमध्ये गहू निर्यात सुरू करण्यासाठी भारताची अंतिम चर्चा सुरू आहे, तर गहू निर्यात सुरू करण्यासाठी तुर्की, चीन, बोस्निया, सुदान, नायजेरिया, इराण इत्यादी देशांशी चर्चा सुरू आहे.

***

S.Patil/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1807343) Visitor Counter : 296


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu