आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतातील कोविडची उपचाराधीन रुग्णसंख्या आज 32,811 इतकी कमी झाली असून, देशातील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ती 0.08% आहे.


गेल्या 24 तासात 2,876 नवीन रुग्णांची नोंद झाली.

भारताच्या देशव्यापी कोविड 19 लसीकरणाने 180.60 कोटींचा टप्पा केला पार

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.72%

साप्ताहीक पॉझिटिव्हीटी दर सध्या 0.44%

Posted On: 16 MAR 2022 9:18AM by PIB Mumbai

रुग्णसंख्या कमी होण्याचा कल कायम राहिल्याने भारताची उपचाराधीन रुग्णसंख्या 32,811 इतकी कमी झाली आहे. सध्याची उपचाराधीन रुग्णसंख्या ही देशाच्या एकूण रुग्णांच्या तुलनेत 0.08% आहे. 

परिणामी, भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर आता 98.72% वर पोहोचला आहे.  गेल्या 24 तासांत 3,884 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, (देशात महामारीची  सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,24,50,055 झाली आहे.

गेल्या 24 तासात 2,876  नवीन रुग्णांची नोंद झाली. 

 


गेल्या 24 तासांत देशात एकूण 7,52,818 कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 78 कोटी 5 लाखांहून अधिक (78,05,06,974) चाचण्या करण्यात आल्या आहेत.


देशभरात  दैनंदिन आणि साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दरात सातत्याने घट होत आहे. सध्या साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर 0.44% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 0.38%.इतका आहे.

 


आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार भारताच्या देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरणाने 180 कोटी 60 लाखांहून अधिक  (1,80,60,93,107) लसमात्रांचा टप्पा पार केला आहे. एकूण 2,11,93,183 सत्रांतून हे उद्दिष्ट साध्य केले आले

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,02,794

2nd Dose

99,87,279

Precaution Dose

43,32,071

FLWs

1st Dose

1,84,11,792

2nd Dose

1,74,82,386

Precaution Dose

66,02,146

Age Group 15-18 years

1st Dose

5,60,41,282

2nd Dose

3,47,40,004

Age Group 18-44 years

1st Dose

55,35,60,174

2nd Dose

45,74,25,030

Age Group 45-59 years

1st Dose

20,25,71,402

2nd Dose

18,32,54,385

Over 60 years

1st Dose

12,66,16,352

2nd Dose

11,41,35,545

Precaution Dose

1,05,30,465

Precaution Dose

2,14,64,682

Total

1,80,60,93,107

 

****

ST/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1806430) Visitor Counter : 159