PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
प्रविष्टि तिथि:
15 MAR 2022 7:40PM by PIB Mumbai

- 180.40 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
- India's Active caseload currently stands at 33,917
- Active cases stand at 0.08%
- Recovery Rate currently at 98.72%
- 4,722 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,24,46,171
- 2,568 new cases recorded in the last 24 hours
- Daily positivity rate (0.37%)
- Weekly Positivity Rate (0.46%)
- 77.97 cr Total Tests conducted so far; 7,01,773 tests conducted in the last 24 hours
|
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona


नवी दिल्ली/मुंबई, 15 मार्च 2022
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
12-14 वयोगटातील सर्व लाभार्थ्यांसाठी मोफत कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण उद्यापासून (16 मार्च 2022), राष्ट्रीय लसीकरण दिनापासून सर्व सरकारी कोविड लसीकरण केंद्रांवर सुरू होईल. हैदराबादच्या बायोलॉजिकल ई. लिमिटेडद्वारे, निर्मित कॉर्बेवॅक्स ही कोविड 19 प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. ऑनलाइन नोंदणीद्वारे (16 मार्च 2022 रोजी सकाळी 9 वाजता सुरु होणाऱ्या) किंवा प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन (ऑनसाइट वॉक-इनद्वारे) ती घेता येईल. केंद्रीय आरोग्य सचिव, राजेश भूषण यांनी आज सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत दुरदृष्य प्रणालीद्वारे (व्हीसी) घेतलेल्या बैठकीत याचा पुनरुच्चार केला.
केन्द्र सरकारने, 16 मार्च 2022 पासून 12-13 वर्षे आणि 13-14 वर्षे वयोगटासाठी ( 2008, 2009 आणि 2010 मध्ये जन्मलेले आहेत. म्हणजेच ज्यांचे वय आधीच 12 वर्षांपेक्षा जास्त आहे) कोविड19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त, 60 वर्षांवरील सर्व जण आता उद्यापासून प्रिकॉशन लसमात्रेसाठी (प्रिकॉशन डोससाठी) पात्र आहेत, कारण या वयोगटासाठीची सहव्याधीची अट काढून टाकली आहे. प्रिकॉशन लसमात्रा, दुसऱ्या लसीकरणाच्या तारखेनंतर 9 महिन्यांनंतर (36 आठवडे) दिला जाते. या संदर्भात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तपशीलवार सूचना आणि कार्यान्वयनाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे पाठवली आहेत.
आरोग्य सचिव आणि एनएचएम मिशन संचालक तसेच राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील इतर अधिकारी यांच्यासह अतिरिक्त सचिव (आरोग्य) डॉ. मनोहर अग्नानी, आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी आभासी बैठकीत उपस्थित होते.
इतर अपडेट्स :
- भारतातील कोविडची उपचाराधीन रुग्णसंख्या आज 33,917 इतकी कमी झाली असून, भारताच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ती 0.08% आहे.
- राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 17.30 कोटींपेक्षा अधिक लसीच्या न वापरलेल्या उपयोगी मात्रा आहेत.
महत्त्वाचे ट्विट्स
* * *
N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1806321)
आगंतुक पटल : 231