आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या (36,168) इतकी असून, गेल्या 675 दिवसांतील ही सर्वात कमी संख्या


गेल्या 24 तासांत देशात 2,503 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद, गेल्या 680 दिवसांतील सर्वात कमी

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लसीच्या 180 कोटी 19 लाखांहून अधिक मात्रा देण्याचे काम पूर्ण

रोगमुक्ती दर सध्या 98.72% इतका


साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.47% आहे

Posted On: 14 MAR 2022 10:05AM by PIB Mumbai

कोरोनामुक्तीवर वैशिष्ट्यपूर्णपणे विजय  मिळवत, भारतात गेल्या 24 तासांत 2,503 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, गेल्या 680 दिवसांतील ही सर्वात कमी रूग्णसंख्या आहे

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 36,168 इतकी असून गेल्या 675 दिवसांतील ही सर्वात कमी संख्या आहे.देशातील  कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.08% आहे.


 

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.72% वर पोहोचला आहे.

गेल्या 24 तासांत 4,377 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, (देशात महामारीची  सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,24,41,449 झाली आहे.


गेल्या 24 तासांत देशात एकूण 5,32,232 कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 77 कोटी 90 लाखांहून अधिक (77,90,52,383) चाचण्या करण्यात आल्या आहेत.


देशभरात  दररोजच्या आणि साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दरात सातत्याने घट होत असून सध्या साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर 0.47% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 0.47%.इतका झाला आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 180 लाख 19 हजारांहून अधिक  (1,80,19,45,779) मात्रा देण्यात आल्यामुळे,, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 180 कोटी 13 लाखांचा (180,13,23,547) टप्पा ओलांडला आहे.आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार देशभरात एकूण 2,10,99,040 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,02,647

2nd Dose

99,84,784

Precaution Dose

43,11,566

FLWs

1st Dose

1,84,11,505

2nd Dose

1,74,77,757

Precaution Dose

65,65,248

Age Group 15-18 years

1st Dose

5,58,92,605

2nd Dose

3,38,83,880

Age Group 18-44 years

1st Dose

55,33,47,902

2nd Dose

45,54,94,388

Age Group 45-59 years

1st Dose

20,25,37,734

2nd Dose

18,28,01,487

Over 60 years

1st Dose

12,65,93,557

2nd Dose

11,38,50,979

Precaution Dose

1,03,89,740

Precaution Dose

2,12,66,554

Total

1,80,19,45,779

 

***

ST/SP/CY

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1805663) Visitor Counter : 216