पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुजरात येथील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 12 MAR 2022 10:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मार्च 2022

गुजरातचे राज्यपाल,आचार्य देवव्रत जी, गृहमंत्री श्री अमित शाह, मुख्यमंत्री श्री भू‍पेंद्र पटेल, राष्‍ट्रीय संरक्षण विद्यापीठाचे प्र-कुलगुरु, विमल पटेल जी, अधिकारी, शिक्षक, विद्यापीठातील विद्यार्थी, पालक, इतर उपस्थित मान्यवर, आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो !

राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठात येणे हा माझ्यासतही विशेष आनंदाचा क्षण आहे. जे युवक, देशभरात संरक्षण क्षेत्रांत आपले करियर घडवू इच्छितात, आणि संरक्षण क्षेत्र म्हणजे केवळ गणवेश आणि हातात दांडा नाही, हे क्षेत्र खूप व्यापक आहे. आणि त्यात उत्तम प्रशिक्षित मनुष्यबळ असणे ही काळाची गरज आहे, आणि म्हणूनच, संरक्षण क्षेत्रासमोर एकविसाव्या शतकातील जी आव्हाने आहेत, त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी, त्यानुसार आपल्या व्यवस्था विकसित व्हाव्यात आणि त्या व्यवस्था सांभाळणाऱ्या व्यक्तिमत्वाचाही विकास व्हावा, आणि या सगळ्या संदर्भात एक दूरदृष्टी ठेवून राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठा चा जन्म झाला. सुरुवातीला हे विद्यापीठ, गुजरातमधील एक संरक्षण शक्ति विद्यापीठ म्हणून ओळखले जात होते. नंतर सरकारने देखील, संपूर्ण देशाच्या दृष्टीने त्याला एक महत्वाचे विद्यापीठ म्हणून मान्यता दिली. आणि आज हे विद्यापीठ देशाचा दागिना ठरला आहे,एक मानबिंदू ठरला आहे.  राष्ट्राच्या सुरक्षेसाठी, इथे जे चिंतन,मनन, शिक्षण, प्रशिक्षण दिले जाते, ते राष्ट्राच्या संरक्षणाच्या दृष्टीने आगामी काळात देशात एक नवा विश्वास निर्माण करेल. आज जे विद्यार्थी-विद्यार्थिनी इथून शिक्षण पूर्ण करुन समाजात जाणार आहेत. त्यांना आणि त्यांच्या पालकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो.  

आज आणखी एक खूपच पवित्र दिन आहे. आजच्याच दिवशी मीठाचा सत्याग्रह करण्यासाठी याच भूमीवरुन दांडी यात्रेची सुरुवात झाली होती. इंग्रजांच्या अन्याय्य राजवटीगांधीजींच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन सुरु झाले, त्याने इंग्रजी राजवटी देखील भारतीयांच्या सामूहिक सामर्थ्याची जाणीव झाली होती. मी दांडी यात्रेत सहभागी झालेल्या सर्व सत्याग्रहांचे पुण्यस्मरण करतो. आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे जेव्हा साजरी करत आहोत, अशा वेळी सर्व वीर स्वातंत्र्य सैनिकांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. 

मित्रांनो,

आजचा दिवस, विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यासाठी खूप मोठा दिवस आहे. मात्र माझ्यासाठी देखील हा एक अविस्मरणीय दिवस आहे. जसे आता अमित भाई सांगत होते. याच कल्पनेसोबत, विद्यापीठाचा जन्म झाला होता. आणि साहाजिकच आहे. कित्येक काळापासून या दिशेने काय काय कामे सुरु आहेट् त्याचे अध्ययन केले. आणि या सगळ्या मेहनती नंतर, गुजरातच्या भूमीवर छोट्या स्वरुपात का होईना, हे विद्यापीठ साकारले. आपण पहाइले आहे, की इंग्रजांच्या काळापासून देशाचे जे संरक्षण क्षेत्र होते, ते त्या काळात, साधारणत: कायदा आणि सुव्यवस्थेचाच भाग होता. आणि इंग्रजांनी देखील आपली राजवट सुरु राहावीयासाठी जरा मजबूत, ऊंचेपुरे, दंडुका चालवला तर सगळ्यांना त्यांची जरब बसेल, अशा लोकांनाच सैन्यात भरती केले जात असे. त्यामागचा हेतू, त्यांची जरब असावी असाच होता. जिथे ज्या समाजाचे लोक बहुसंख्य असतील, तिथे त्या समाजाच्या लोकांना लष्करात घेतले जाई, त्यांचे काम होते, भारतीयांवर लाठीमार करणे, जेणेकरुन इंग्रज सुखाने-शांतपणे आपले जग चालवू शकतीलल. मात्र स्वातंत्र्यानंतर, अशा लष्करात आमूलाग्र परिवर्तन आणण्याची गरज होती, सुधारणेची गरज होती. मात्र, दुर्दैवाने आपल्या देशात जेवढे काम व्हायला हवे होते, त्यात आपण बरेच मागे राहिलो. आणि म्हणूनच आजही सर्वसामान्य माणसांचा, सुरक्षा रक्षकांविषयी, विशेषतः पोलिसांविषयी जो समज आहे, तो असाच आहे – की या लोकांपासून जरा दूरच राहाणे योग्य.

आपल्या देशाचे सैनिकही गणवेशात असतात. मात्र सैन्याविषयी लोकांच्या मनात काय प्रतिमा आहे, काय भावना आहे? की जर कुठलेही संकट आले, आणि लोकांना दुरून जरी सैन्य येतांना दिसले तरी त्यांना वाटते की आता काही संकट नाही, आपल्याला काही धोका नाही, करण हे लोक आले आहेत.एक वेगळी भावना आहे. आणि म्हणूनच भारतात असे मनुष्यबळ सुरक्षा क्षेत्रांत अधिकाधिक तयार करणे आवश्यक आहे, असे मनुष्यबळ जे सर्वसामान्य लोकांच्या मनात मैत्रीभावना तयार करेल, एक विश्वासाचे वातावरण तयार करेल. आणि म्हणूनच. आपल्याला पून प्रशिक्षण पद्धतीतच बदल करणे आवश्यक ठरले होते. त्याच सखोल विचारातून, भारतात पाहिल्यांदा अशाप्रकारचा प्रयोग झाला. ज्याचा विस्तार होत होत आज हे संरक्षण विद्यापीठ आपल्यासमोर साकार झाले आहे .

कधी काळी असे वाटत असे, की संरक्षणाचा अर्थ म्हणजे गणवेश,अधिकार, हातात दंडुका आणि पिस्तूल. आज मात्र तो काळ गेला आहे. आज संरक्षण क्षेत्राने नवे रंगरूप घेतले आहे, त्यात आंनेक नवनवी आव्हाने निर्माण झाली आहेत. पूर्वीच्या काळी एका कुठल्या ठिकाणी काही घटना झाली तर त्याची माहिती गावाच्या दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचता पोहोचता कित्येक तास लागत आणि दुसऱ्या गावात पोचायला तर कधीकधी काही दिवस लागत.पूर्ण राज्यांत टी बातमी पोचेपर्यंत 24 तास 48 तास लागत, त्याकाळात पोलिस आपली व्यवस्था करीतसगळ्या वस्तू, पुरावे नीट गोळा केले जात. आज मात्र, वेगाने घटना घडतात, संपर्क निर्माण केला जातो, गोष्टी सरळ  बाहेर येतात. 

अशा वेळी, कुठल्याही एका जागी बसून या व्यवस्था सांभाळणे शक्य नाही. आणि म्हणूनच आता प्रत्येक विभागात अनुभवी तज्ञ हवेत, प्रत्येक विभागात सामर्थ्य हवे, प्रत्येक विभागात याप्रकारचे बळ मिळावे. आणि म्हणूनच आपल्या आपले आताचे संख्याबळ लक्षात घेता आपल्यालं उत्तम प्रशिक्षित अशा मनुष्यबळाची गरज आहे, जे सगळ्या गोष्टी सांभाळू शकतील. ज्यांना तंत्रज्ञान देखील येत असेल, त्याचा वापर करण्याची तयारी आणि समज असेल, ज्याला मानवी मानसशास्त्राची जाणीव असेल, जो युवा असेल. युवा पिढीशी संवाद साधणारा आणि त्यांच्या बोलण्या-वागण्याच्या पद्धती त्याला माहिती असतील, असा असेल तरच, मग कधीकधी मोठमोठी आंदोलने असतील, तर मोठ्या नेत्यांची समजूत काढावी लागते, त्यांच्या बोलण्याची तयारी असावी लागते, त्यांच्याशी वाटाघाटी करण्याचीक्षमता असावी लागते.

जर सुरक्षिततेच्या क्षेत्रांत प्रशिक्षित मनुष्यबळ नसेलं, तर ते वाटाघाटी करण्याची क्षमता गमावून  बासतो. आणि त्यामुळे, शेवटच्या क्षणापर्यंत  मिळवलेला विजय शेवटच्या क्षणी कधीतरी हातातून निसटून जाऊ शकतो. एखादा शब्द कमी अधिक वापरला गेला, तरी परिस्थिती बिघडू शकते. माझ्या म्हणणाच्या अर्थ

असा आहे, की लोकशाही व्यवस्थेत, जनतेला सर्वोच्च मानत, समाजात घात करणारे जे समाजकंटक असतात, त्यांच्याशी कठोरपणे तर जनतेशी नम्रपणे, प्रेमाने वागायचे हा मूलमंत्र घेऊन आपल्याला काहीअसे मनुष्यबळ विकसित करावे लागेल. आता आपण बघतो, की जगातील अनेक देशांच्या पोलिसांच्या बाबतीत खूप उत्तम छबी असल्याची उदाहरणे समोर येत आहेट्. आपल्या देशाचे हे दुर्दैव आहे, की- एखादा चित्रपट तयार होतो, तेव्हा त्यात सगळ्यात वाईट व्यक्तिरेखा असते,ती पोलिसवाल्याची असते. वर्तमानपत्रातून देखील पोलिसांची खूप बदनामी केली जाते. आणि हे थांबण्यासाठी समाजात त्यांचे योग्य आणि वास्तव चित्र जायला हवे.

आजकाल सोशल माध्यमांमुळे, आपण कोरोना काळात बघितलं आहे, गणवेशात काम करणारे पोलीस कर्मचारी यांचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. कोणी पोलीस कर्मचारी रात्री कामाला जातो आहे, भूक लागली आहे तर त्याला खायला मिळत आहे, कुणाकडे लॉकडाउनमुळे औषधं नाहीत, तर पोलीस कर्मचारी दुचाकीवरून जाऊन त्यांना औषधं नेऊन देत आहेत. एक मानवीय चेहरा, पोलिसांचा माणुसकीचा चेहरा या कोरोन कालखंडात सर्वसामान्य लोकांच्या मनात ठसत होता. मात्र नंतर हे सगळं थांबलं.

असं नाही की काम करणं बंद झालं आहे., मात्र ज्या लोकांनी एक समाज पसरवून ठेवला आहे की जेव्हा नकारात्मक वातावरण असतं, तेव्हा चांगलं करण्यची इच्छा असली तरी त्याबद्दल मनात एक निराशा येते. अशा विपरीत वातावरणात तुम्ही सर्व युवक एक निश्चय करून घरातून बाहेर पडले आहात. तुमच्या पालकांनी हे ठरवून इथे पाठवलं आहे, की कधी ना कधी तुम्ही सर्वसामान्य लोकांच्या अधिकारांचे संरक्षण, सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेची काळजी, समाज-जीवनात सुखाचं वातावरण तयार करत असलेल्या, त्याची चिंता, सामान्य समाज जीवनात एकता आणि सद्भावना टिकून राहावी, प्रत्येकानं आपलं आयुष्य मोठ्या आनंदात आणि उत्साहात घालवावं, समाज जीवनात लहान मोठे आनंद - उत्सवाचे प्रसंग मोठ्या उत्साहाने साजरे होत जावे, या भूमिकेतून समाज जीवनात आपण आपली भूमिका कशी निभावू शकू. आणि म्हणून आता केवळ शरीर यष्टीच्या जोरावार सुरक्षा दल या देशाची सेवा करू शकतील, ते केवळ सीमेपर्यंत मर्यादित आहे, मात्र आता हे एक फार मोठं क्षेत्र तयार झालं आहे, जिथे आपल्याला प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज पडणार आहे.

आजचा जो काळ आहे, कुटुंब लहान होत गेली आहेत. आधी कसं होतं, पोलीस कर्मचारी जास्तीची ड्युटी करून थकून घरी जात होता, तेव्हा एक मोठं संयुक्त कुटुंब असायचं, तिथे आई सांभाळून घ्यायची, वडील सांभाळून घ्यायचे, आजी आजोबा जर घरात असतील, तर ते सांभाळून घ्यायचे, कुणी पुतण्या सांभाळून घेत असे, मोठा भाऊ घरात आहे, तर तो सांभाळून घेत असे, वाहिनी असायची, ती सांभाळून घ्यायची, तर मनावरचा ताण उतरत असे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तयार होऊन कामावर जात असे. आज कुटुंब फार लहान होत आहेत. जवान कधी 6 तास, कधी 8 तास, कधी 12 तास कधी 16 तास अतिशय विपरीत परिस्थितीत काम करत असतो. मग घरी गेल्यावर, तिथे कुणीच नाही. फक्त जेवा, विचारपूस करणारं कुणी नाही, आई वडील नाहीत, काळजी करणारं दुसरं कुणी नाही.

अशा वेळी आपल्या सुरक्षा दलासमोर तणाव ही एक फार मोठी समस्या, फार मोठं आव्हान म्हणून उभं राहिलं आहे. कौटुंबिक आयुष्यातल्या अडचणी, कामाच्या ठिकाणच्या अडचणी, यामुळे त्यांच्या मनावर फार मोठा तणाव असतो. अशा वेळी तणाव मुक्त काम करण्याचे प्रशिक्षण हे आजच्या सुरक्षा क्षेत्रासाठी आवश्यक झाले आहे. आणि त्यासाठी प्रशिक्षकांची गरज निर्माण झाली आहे. हे संरक्षण शक्ती विद्यापीठ आहे, जिथे अशाप्रकारचे प्रशिक्षक देखील तयार केले जाऊ शकतात जे गणवेशात काम करणार नाहीत, मात्र गणवेशात काम करणाऱ्यांना मानाने आनंदी ठेवण्याचं काम इथून प्रशिक्षण घेऊन करू शकतील.

आज सैन्य दलात देखील मोठ्या प्रमाणात योग शिक्षकांची गरज पडत आहे. आज पोलीस दलात देखील म्प्ठ्या प्रमाणात योग आणि तणावमुक्ती शिकवणाऱ्या शिक्षकांची गरज आहे, हे आता सर्वच सुरक्षा क्षेत्रांत पसरेल.

त्याच प्रकारे तंत्रज्ञान हे देखील एक मोठं आव्हान आहे. आणि मी बघितलं आहे, जेव्हा कौशल्य नसतं तेव्हा आपण वेळेवर जे करायला पाहिजे ते करू शकत नाही, वेळ वाया जातो. ज्या प्रकारे सायबर सुरक्षेचे मुद्दे बनले आहेत, ज्या प्रकारे गुन्ह्यांत तंत्रज्ञान वाढत आहे, त्याच प्रकरे गुन्हे अन्वेषणात तंत्रज्ञान सर्वात जास्त मदतीला देखील येत आहे. पूर्वीच्या काळी साधी चोरी जरी झाली तरी त्या चोराला पकडायला खूप मोठा काळ लागायचा. पण आज कुठे सीसीटीव्ही कॅमेरा असेल, सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज बघितलं तर लक्षात येतं, की ही व्यक्ती संशयास्पद हालचाली करत आहे, आधी या भागात गेला, मग त्या भागात गेला, तुम्ही सगळ्याची संगती लावता, आणि आपल्याकडे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, तर अगदी सहज एखाद्या व्यक्तीचा माग काढला जाऊ शकतो, की ती इथून आली, इकडे गेली, आणि या ठिकाणी तिनं बेकायदा काम केलं, पकडली जाते.

तर, ज्याप्रमाणे गुन्हेगारी जगात तंत्रज्ञांचा उपयोग होत आहे, त्याच प्रमाणे सुरक्षा दलांसाठी देखील तेन्त्राज्ञान एक फार मोठं सशक्त हत्यार बनत आहे. मात्र, योग्य लोकांच्या हाती योग्य हत्यार आणि वेळेवर काम करण्याचे सामर्थ्य प्रशिक्षणाशिवार शक्य नाही. आणि मला असं वाटतं, की जगात घडलेल्या मोठ मोठ्या घटना, जर तुम्ही जर या क्षेत्रातील महत्वाच्या घटनांचं अध्ययन तुम्ही वाचत असाल तर त्यात येत असले की कशा प्रकारे तंत्रज्ञाचा उपयोग गुन्हे करण्यात होत असतो आणि कशा प्रकारे तंत्रज्ञांचा वापर करून गुन्ह्यांची उकल केली जाते.

हे प्रशिक्षण केवळ सकाळी कवायत करणे, शारीरिक आरोग्य, केवळ यामुळे आता संरक्षण क्षेत्रात काम भागत नाही. कधी कधी तर मी विचार करतो, माझे दिव्यांग बंधू भगिनी एकवेळ शारीरिक दृष्ट्या सुदृढ नसतील, तरीही संरक्षण शक्ती विद्यापीठात प्रशिक्षण घेतील तर ते देखील संरक्षण क्षेत्रात शारीरिक अक्षमता असूनही, प्रशिक्षणामुळे मानसिकतेमुळे फार मोठं योगदान देऊ शकतात. म्हणजे पूर्णच्या पूर्ण परिस्थितीच बदलून गेली आहे. आपल्याला या संरक्षण शक्ती विद्यापीठाच्या माध्यमातून त्या परिस्थितीला अनुकूल व्यवस्था कशा विकसित करता येतील, या दिशेनं प्रयत्न केले पाहिजेत.

आणि जसं आत्ताच गृह मंत्र्यांनी सांगितलं की या वेळी एक प्रकारे गांधीनगर आज शिक्षणाच्या दृष्टीने फार मोठा गतिमान क्षेत्र बनत आहे. एकाच भागात इतकी सगळी विद्यापीठे आणि दोन विद्यापीठे आपल्याकडे अशी बनत आहेत, या पृथ्वीवर जगातलं पाहिलं विद्यापीठ आहे. संपूर्ण जगत एकच, संपूर्ण जगात न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठ नाही. संपूर्ण जगात कुठेही लहान मुलांचे विद्यापीठ नाई. गांधीनगर आणि हिंदुस्तान एकमात्र आहेत जिथे ही दोन्ही विद्यापीठे आहेत.

आणि माझी अशी इच्छा आहे, त्याचप्रमाणे, राष्ट्रीय विधी विद्यापीठ, म्हणजे गुन्हे अन्वेषणापासून ते न्याय मिळवून देईपर्यंतचे सगळे टप्पे इथेच एकत्रित करण्यात आले आहे. आणि हे सगळे एकत्रित शिक्षण तेव्हाच कमी येऊ शकेल, तेव्हा ही विद्यापीठे वेगवेगळे नाही, तर एकत्रित काम करतील. राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ आपले काम करत आहे. न्यायवैधक विज्ञान विद्यापीठाचे आपले वेगळे जग आहे. राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्वतंत्रपणे चालत आहे, असे झाले तर या तिघांचा जो एकत्रित परिणाम आपल्याला साध्य करायचा आहे, तो येऊ शकणार नाही.

आणि म्हणूनचमी आज जेव्हा तुम्हा सगळ्यांमध्ये आलो आहे, इथे विद्यापीठ चालवणारे लोक बसले आहेत, त्यांना माझी आग्रहाची विनंती आहे की वर्षातून दर तीन महिन्यांनी आपण तिन्ही विद्यापीठांचे विद्यार्थी, प्राध्यापक, यांचे एक सामायिक चर्चासत्र आयोजित करावे. या चर्चासत्रात, तिन्ही विषयांवरील विविध पैलूची चर्चा होईल आणि संरक्षण/सुरक्षा क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी एक नवे मॉडेल विकसित करता येईल. न्यायवैधक विज्ञानाच्या माध्यमातून न्याय कसादेता येईल, हे राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या मुलांना शिकावे लागेल.

गुन्हे अन्वेषण करणाऱ्या अधिकाऱ्यांना याचा विचार करावा लागेल की अमुक दंड विधानात कुठलं कलम कसं लावता येईल, मी पुरावे कसे घेऊन जाऊ, जेणेकरून न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठातून मला तांत्रिक मदत मिळेल, आणि राष्ट्रीय कायदा विद्यापीठातून मला कायदेशीर मदत मिळेल. आणि मी गुन्हेगाराला शिक्षा देऊ शकेन. आणि मी देश सुरक्षित करू शकेन. तेव्हा कुठे जेव्हा न्यायव्यवस्था वेळेवर न्याय निवडा करू शकते आणि गुन्हेगारांना शिक्षा करू शकते, त्यामुळे गुन्हेगारांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण होईल.

मला तर या सरंक्षण शक्ती विद्यापीठामध्ये कारागृहांच्या व्यवस्थेविषयी ‘मास्टरी’ मिळवतील, असे लोक तयार केले जावेत, असेही वाटते. कारागृहांमध्ये आधुनिक व्यवस्था कशा पद्धतीने बनेल, तुरूगांमध्ये जे कैदी आहेत, जे ‘अंडर ट्रायल’ आहेत, त्यांची मानसिकता पाहून- पाहून काम करणारे लोक कसे तयार होतील. तुरूंगातल्या लोकांना गुन्हेगारी मानसिकतेतून बाहेर कसे काढता येईल, त्यांनी कोणत्या परिस्थितीमध्ये गुन्हा केला होता, याचा सर्व मनोवैज्ञानिक दृष्टीने, पैलूंनी अभ्यास करण्याचे काम केले जावे.  न्याय वैद्यक विद्यापीठामध्येही असा अभ्यास होत असतो. गुन्हेगारी प्रवृत्ती जाणून घेताना खूप मोठा अभ्यास होत असतो. संरक्षण शक्ती विद्यापीठामध्येही त्यापैकी  एका  पैलूचा अभ्यास होईल. मला असे वाटते की, आपल्याकडे असे लोक तयार होऊ शकतात, की त्यांच्याकडच्या कौशल्याच्या मदतीने तुरूंगामधल्या संपूर्ण वातावरणात बदल घडवून आणण्याचे काम होईल. त्यांच्या मानसिकतेचा विचार करतील आणि चांगला मनुष्य बनवून त्याला कारागृहातून बाहेर काढून त्याच्या योग्यतेचे जिथे काम असेल, जिथे मनुष्य बळाची आवश्यकता असेल तिथे पाठवू शकतील. फक्त पोलिस खात्यामध्ये कोण्या एका शहरामध्ये एका भागाच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे काम कालपर्यंत सांभाळणा-या कर्मचा-याला अचानक आता तू कारागृह सांभाळ असे सांगितले जाते; त्याला तर याचे पूर्ण प्रशिक्षणही नाही. त्याला गुन्हेगार लोकांबरोबर कशी ऊठ-बस केली पाहिजे, हे फक्त तो जाणून आहे, एवढेच प्रशिक्षण दिले आहे, हे ठीक आहे. परंतु इतक्या अल्प प्रशिक्षणाने काम भागत नाही. मला जाणीव आहे की, इतक्या सा-या क्षेत्रांचा विस्तार झाला आहे, त्या सर्व क्षेत्रासाठी आपल्याला या दिशेने प्रयत्न केला पाहिजे.

आज मला या संरक्षण विद्यापीठाच्या एका भव्य भवनाचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली आहे. ज्यावेळी आम्ही यासाठी हे स्थान निश्चित करीत होतो, त्यावेळी माझ्यासमोर अनेक मोठे प्रश्न उभे राहिले होते. मोठ-मोठाले दबावही येत होते. प्रत्येकाचे म्हणणे असे होते; साहेब, तुम्ही इतक्या दूर का पाठवत आहात, हे का करीत आहात? परंतु माझे मत होते, गांधीनगरपासून 25-50 किलोमीटर दूर जायला लागते, म्हणून काही त्या विद्यापीठाचे महत्व कमी होणार नाही. जर विद्यापीठामध्ये दम असेल तर गांधीनगर भागावर आपोआप लक्ष्य केंद्रीत होवू शकते. आणि आज हे भवन पाहिल्यानंतर मला असे वाटते की, याचा आता प्रारंभ झाला आहे.

मात्र, हे भवन हिरवेगार ठेवणे, ऊर्जावान ठेवणे, देखणे-शानदान ठेवण्याची जबाबदारी एका कंत्राटदाराने इमारत बनवून निघून गेल्यानंतर पार पाडली जात नाही, एका सरकारने केवळ अंदाजपत्रकामध्ये खर्चाची तरतूद करून होत नाही. तर प्रत्यक्षात तिथे राहणा-या, काम करणा-या  प्रत्येक व्यवतीने त्या स्थानाला आपले मानले पाहिजे. प्रत्येक खिडकीसुद्धा आपलीच मानली पाहिजे. फर्निचरची प्रत्येक वस्तू आपली मानून ती वस्तू चांगली राहण्यासाठी स्वतः काही ना काही करीत राहिले पाहिजे. असे केले तरच ते भवन आपोआपच शानदार राहू शकणार आहे. 

एके काळी म्हणजे50 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. अहमदाबादमध्ये ज्यावेळी आयआयएम बनले होते, त्यावेळी 50-60 वर्षापूर्वी बनविण्यात आलेले आयआयएम भवन म्हणजे संपूर्ण हिंदुस्तानमध्ये एक ‘मॉडेल‘ म्हणून त्याकडे पाहिले जात होते. नंतर ज्यावेळी राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे भवन बनले त्यावेळीही संपूर्ण हिंदुस्तानमध्ये राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या भवनाकडे लोक आकर्षित झाले होते. मला आज अगदी पक्के माहिती आहे की, आगामी दिवसांमध्ये हा संरक्षण विद्यापीठाचा परिसरही लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनेल. आमच्या काळखंडामध्येच आयआयटीचा जो परिसर बनविण्यात आला आहे, ऊर्जा विद्यापीठाचा जो परिसर तयार करण्यात आला आहे, राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा परिसर बनला आहे, न्याय वैद्यक विद्यापीठाचा जो परिसर बनला आहे, मला वाटते की, यामध्ये आणखी एक रत्न म्हणजे आपल्या या संरक्षण विद्यापीठाचा परिसरसुद्धा आहे. एक नवीन रत्न बनून हा परिसर जोडला गेला आहे आणि यासाठी मी आपल्या सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो.

आणि मला पूर्ण विश्वास आहे की, इथे एक नवीन ऊर्जा -चैतन्य, एक नवा उत्साह तयार झाला आहे आणि देशातील जी गुणात्मक म्हणजेच एक प्रकारे समाजातले जे ‘क्रीम’ मुले आहेत, त्यांना मी इथे येण्‍याचे आमंत्रण देतो.  त्यांनी या कामाला हलके अथवा कमी समजू नये. हे काम कमी दर्जाचे आहे, असे मानण्‍याची  चूक आपण कधी करू नये, आम्ही चूक केलेली नाही.  इथे यावे, यामध्ये देशाची सेवा करण्यासाठी खूप विस्तारित क्षेत्र आहे. आणि आमचे पोलिस जवान आहेत, आमचे गृह मंत्रालयही आहे.  हे काही पोलिस विद्यापीठ नाही. हे संरक्षण विद्यापीठ आहे. संपूर्ण राष्ट्राच्या संरक्षणाच्या संदर्भामध्ये मनुष्य बळ तयार करणारे हे विद्यापीठ आहे. ते अनेक क्षेत्रांमध्ये जातील, इथूनच असे लोकही तयार होतील, जे संरक्षण क्षेत्रामध्ये काम करणा-यांसाठी पोषणाचे  कार्य करतीलयामध्ये संरक्षणविषयक तज्ज्ञ असतील. असे अनेक तज्ज्ञ इथे तयार होतील की, ते गुन्हेगारी दुनियेच्या नोंदी ठेवण्यात येणारे सॉफ्टवेअर कसे असले पाहिजे, या वर काम करतील. यामध्ये जरूरी नाही की, त्यांना गणवेश- वर्दी घालण्याची आवश्यकता पडेल. परंतु ते गणवेशाची, वर्दीची मानसिकता जाणू शकतील, कोणीही काम करू शकते मात्र सर्वांनी मिळून काम करून त्याचा परिणाम चांगला आला येवू शकतो. या भावनेने आज या विद्यापीठाच्या माध्‍यमातून  प्रगतीच्या दिशेने पुढे जाता येणार आहे.

आणि ज्याप्रमाणे आम्ही विचार केला आहे, न्याय वैद्यक विद्यापीठाचा देशामध्ये विस्तार झाला पाहिजे, संरक्षण शक्ती विद्यापीठाचा देशामध्ये विस्तार झाला पाहिजे आणि विद्यार्थी दशेपासूनच मुलांच्या मनामध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झाली पाहिजे. काही मुले असतात, जी लहानपणीच विचार करीत असतात की, आपण क्रीडापटू बनायचे आहे, काही लोक लहानपणी विचार करतात आपण डॉक्टर बनायचे आहे, काहीजण लहानपणीच विचार करतात आपण अभियंता बनायचे आहे, हे एक क्षेत्र आपले आहे. भले मग आज एका गटामध्ये नकारात्मकतेचे वातावरण गणवेशाविषयी बनलेले आहे. मात्र आपण आपल्या कर्तव्याने, आपल्या कठोर परिश्रमाने आणि आपल्या मानवतावादी मूल्यांचा आदर करीत काम केले तर मला पूर्ण विश्वास आहे की, जे व्यवस्थेचे योग्य भाग बनले आहेत, त्यामध्ये परिवर्तन घडवून सामान्य मानवामध्ये विश्वास जागृत करण्याचे काम आपली ही गणवेशधारी शक्ती करू शकते आणि जर गणवेशधारी शक्ती करू शकते तर सरकारी चौकटीत काम करणारे पट्टा आणि टोपी लावणा-यांचा समावेश मी यामध्ये करत नाही. आज खाजगी सुरक्षा देणा-यांच्या संख्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. खाजगी सुरक्षा देणा-यांचे एक मोठे क्षेत्र बनले आहे. आणि मी पाहिले आहे, यामध्‍ये अनेक स्टार्टअप विकसित होत आहेत, ते फक्त संरक्षण क्षेत्रामध्ये काम करीत आहेत. तुमचे हे प्रशिक्षण अशा नव-नवीन स्टार्टअपच्या दुनियेमध्ये येण्यासाठीही तुम्हाला आमंत्रण देत आहे.

मला विश्वास आहे की, आपल्यासारखे सहकारी, माझे नवयुवा सहकारी देशाच्या रक्षणाला प्राधान्य देण्यासाठी ज्यावेळी पुढे येत आहेत, त्यावेळी आणखी एक मोठे क्षेत्र आहे, त्याला आपण समजून घेतले पाहिजे. ज्याप्रमाणे मी प्रारंभी म्हणालो की, ‘वाटाघाटी करणे ही एक कला असते, ज्यावेळी प्रशिक्षण पूर्ण होते, त्यावेळी चांगले वाटाघाटी करणारे, बोलणी करणारे बनू शकतात. आणि ज्यावेळी वाटाघाटी करणारे तयार होतात, त्यावेळी ते वैश्विक स्तरावर कामी येतात. हळू- हळू तुम्ही प्रगती करीत- करीत वैश्विक स्तरावरचे वाटाघाटी करणारे, बोलणी करणारे  बनू शकता.

आणि मी असे मानतो की, या गोष्टीचीही समाज-जीवनामध्ये खूप मोठी आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे गर्दीचे मानसशास्त्र, एकत्रित असलेल्या गटाचे मानसशास्त्र याचा जर आपण शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला नाही तर आपण असे अवघड प्रसंग हाताळू शकणार नाही. संरक्षण विद्यापीठाच्या माध्यमातून आपण यापद्धतीने लोकांना तयार करू इच्छितो कीज्या प्रकारे परिस्थिती निर्माण झाली आहे, ती परिस्थिती सांभाळून काम करण्याचे सामर्थ्य आले पाहिजे. आपल्याला देशाच्या संरक्षणासाठी समर्पित कार्यशक्ती प्रत्येक स्तरावर तयार केली पाहिजे. मला आशा आहे की, आपण सर्वजण मिळून या दिशेने कार्य करण्याचा प्रयत्न कराल.

 आज ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे जाण्याची संधी मिळाली आहे, त्यांनाही मी अनेक-अनेक शुभेच्छा देतो. मात्र मी त्यांना सांगू इच्छितो की, कदाचित तुमच्या मनामध्ये आगामी काळामध्ये असा विचार येवू शकतो की, अरेच्या आपण एकदा तरी गणवेश घातला पाहिजे - वर्दी घातली ना की संपूर्ण दुनिया आपल्या मुठीत येईल. मित्रांनो, अशी चूक कधी करू नका. असा विचार गणवेशाची-वर्दीची प्रतिष्‍ठा  वाढविणारा  नसतो . वर्दीचीप्रतिष्‍ठा कधी वाढते तर ज्यावेळी त्या व्यक्तीच्या आतमध्ये मानवता जिवंत असतेज्यावेळी गणवेशधारीच्या मनामध्ये करूणेचा भाव असतो, त्याचवेळी वर्दीचा आदर वाढतो. ज्यावेळी माता, भगिनी, दलित, पीडित, शोषित, वंचित यांच्यासाठी काही करण्याची आकांक्षा मनामध्ये जागृत असते, त्याचवेळी या वर्दीचे मूल्य वाढते, गणवेशाची ताकद वाढते. आणि म्हणूनच माझ्या मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये तर या गोष्टी येणारच आहेत. कोणत्या ना कोणत्या रूपाने या गोष्टी तुमच्या जीवनात येणार आहेत. कारण आता ज्या  क्षेत्रामध्ये तुम्ही जात आहात तिथे  मानवतेच्या मूल्यांना जीवनामध्ये सर्वोपरी मानून तुम्हाला काम करायचे आहे. आपल्याला यासाठी मनामध्ये संकल्प करायचा आहे की, समाज -जीवनामध्ये या शक्तीविषयी जो भाव बनला आहे, त्या अभावालाच प्रभाव बनवून त्याला आपलेपणाच्या भावनेची जोड दिली पाहिजे. आणि म्हणूनच माझी अशी इच्छा आहे की, गणवेशाचा- वर्दीचा प्रभाव कायम राहिला पाहिजे मात्र त्यामध्ये मानवतेचा अभाव किंचितही असू नये. हा भाव मनात कायम ठेवून माझी ही नवयुवकांची पिढी पुढे गेली तर त्याचा खूप मोठा परिणाम मिळेल. 

आज इथे मला सत्कार करताना जाणवले की, कदाचित कन्यांची संख्या जास्त होती. वास्तविक मी काही मोजणी केली नाही, पण हा माझा प्राथमिक अंदाज आहे. या क्षेत्रामध्‍ये  कन्या संख्येने जास्त असणेही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. याचा अर्थ असा आहे की, या दिवसांमध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये आज आपल्या कन्यांनी मोठ्या प्रमाणावर स्थान निर्माण केले आहे. मोठ्या संख्येने युवती या क्षेत्रामध्ये येत आहेत. इतकेच नाही तर, सेनेमध्येही मोठ्या पदांवर आज आमच्या युवती पुढे जात आहेत. त्याच प्रकारे मी पाहिले की, एनसीसीमध्ये छात्रांची संख्या वाढत आहे. आज भारत सरकारने एनसीसीचे क्षेत्रही विस्तारले आहे. अनेकपटींनी वाढविले आहे आणि सीमावर्ती भागात ज्या शाळा आहेत, तिथे काही -काही स्थानी एक स्वतंत्र रूपात एनसीसीची शाळा म्हणून हळूहळू विकसित करू शकतो. शाळांची एनसीसी चालविण्यामध्ये खूप मोठे योगदान तुम्हीही देवू शकता.

याच प्रकारे सैनिकी शाळा आहेत, या सैनिकी शाळांमध्येही कन्यांना प्रवेश देण्याचा एक खूप मोठा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. त्यामुळे आपल्या कन्यांची शक्ती आहे, आणि आम्ही पाहिले आहे की, जीवनामध्ये आता कोणतेही असे क्षेत्र नाही की, त्यामध्ये प्रभावी भूमिका आमच्या कन्या पार पाडू शकत नाहीत. सर्व क्षेत्रात कन्या, महिला प्रभाव दाखवू शकतात. मग ते ऑलिम्पिकमध्ये विजय प्राप्त करणे असो, त्यामध्येही आमच्या कन्याच संख्येने जास्त आहेत. विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये पाहिले तर आमच्या कन्या जास्त आहेत. त्याचप्रकारे शिक्षणाच्या क्षेत्रामध्येही आमच्या महिलांची संख्या जास्त आहे. सुरक्षा क्षेत्रामध्येही ज्यावेळी आमच्या कन्यांचे प्रभुत्व तितकेच महत्वपूर्ण असेल.  मला विश्वास आहे कीमाझ्या देशाच्या माता-भगिनींना सुरक्षेची जाणीव होईल आणि या गोष्टीसाठी आवश्यक असणारी भूमिका पार पाडण्यासाठी त्या पुढे येतील. एक  फार मोठा, महत्वपूर्ण उपक्रम आम्ही सुरू केला आहे. त्या उपक्रमाला यशस्वी बनविण्याचे काम पहिल्या तुकडीचे सर्वात जास्त असते. 

या विद्यापीठामुळे किती मोठे परिवर्तन घडून येणार आहे, एक मनुष्य बळ विकसित करणारी संस्था किती मोठे परिवर्तन आणू शकते, हे समजण्यासाठी गुजरातच्या भूमीवर घडलेल्या दोन घटना मी आपल्यासमोर मांडू इच्छितो. अनेक वर्षांपूर्वी आणि ज्याकाळी गुजरातमध्ये सरकारची काहीही भूमिका नव्हती, त्यावेळी इथे अहमदाबादमध्ये जे महाजन लोक होते, समाजामध्ये जे श्रेष्ठी- मान्यवर लोक होते, व्यापारी होते, त्या सर्वांनी मिळून निश्चित केले की, गुजरातमध्ये एक औषध निर्माण शास्त्राचे महाविद्यालय असले पाहिजे. आजपासून 50 वर्षांपूर्वी इथे एक औषध निर्माण शास्त्राचे महाविद्यालय बनविण्यात आले. त्यावेळी ते एक सामान्य महाविद्यालय बनले. परंतु आज  संपूर्ण औषध निर्माण उद्योगाचे नेतृत्व  गुजरात करीत आहे. आज गुजरात औषध निर्माणामध्ये अग्रेसर बनून या उद्योगाचे नेतृत्व करीत आहे, त्याचे मूळ इथे पहिल्यांदा सुरू झालेल्या त्या लहानशा औषध निर्माण महाविद्यालयामध्ये आहे. या महाविद्यालयामध्येच तर मुले तयार झाली होती, त्यांनीच पुढे जावून गुजरातला औषध निर्माण उद्योगाचे खूप मोठे केंद्र बनविले आहे. आणि त्याच औषध निर्माण उद्योगांमुळे आज संपूर्ण दुनियेने कोरोनानंतर हिंदुस्तानला औषध निर्माणाचे केंद्र मानले. हे सगळे एक छोटे महाविद्यालय त्यावेळी सुरू झाल्यामुळे घडले. 

याचप्रमाणे अहमदाबाद आयआयएम! हे काही विद्यापीठ नाही, तो काही पदवी अभ्यासक्रम नाही, कोणत्याही विद्यापीठाने त्याला मंजुरी दिली नाही. तर एक प्रमाणपत्र देणारा अभ्यासक्रम आहे. ज्यावेळी आयआयएम सुरू झाले त्यावेळी कदाचित लोक विचार करीत असतील, सहा-आठ, बारा महिन्यांच्या अभ्यासक्रमाने  आयुष्यात काय होणार? मात्र आयआयएमने एक अशी प्रतिष्ठा निर्माण केली की, आज दुनियेमध्ये जितके मोठ-मोठे सीईओ आहेत, त्यांनी  काही ना काही अभ्यासक्रम आयआयएमच्या माध्यमातून केला आहे. मित्रांनो, एक वि़द्यापीठ काय करू शकते, याचे स्वप्न मी या संरक्षण विद्यापीठामध्ये पाहत आहे. जे हिंदुस्तानच्या संपूर्ण संरक्षण क्षेत्राचे चित्र पालटून टाकेल. संरक्षणविषयी जो विचार केला जातो, तो बदलून टाकेल आणि संरक्षण क्षेत्रामध्ये येणा-या आपल्या भावी पिढीतल्या युवकांसाठी  नवीन परिणाम घेवून येईल. या विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान समारंभातून पदवी घेवून बाहेर पडणा-यांची जबाबदारी आणखी जास्त आहे. आणि म्हणूनच मी पहिल्या पदवीदान समारंभानंतर ज्यांना इथून निरोप दिला जात आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्ही इथे जे काही मिळवले आहे, त्याला आपला जीवनभराचा मंत्र बनवा. तुम्ही देशाच्या या संरक्षण विद्यापीठाची प्रतिष्ठा वाढवा. या क्षेत्रामध्ये येण्यासाठी बुद्धिमान, हुशार तरूणांना प्रेरण, प्रोत्साहन द्यावे, मुलांना-मुलींना प्रोत्साहन द्यावे, अनेकजण तुमच्याकडे पाहून प्रेरणा घेतील. या क्षेत्रामध्ये खूप मोठी भूमिका तुम्ही समाज-जीवनामध्ये पार पाडू शकता.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये तुम्ही एका नव्या यात्रेला प्रारंभ केला आहे, मला विश्वास आहे की, ज्यावेळी देश स्वातंत्र्याचे शतक साजरे करेल, त्यावेळी संरक्षण क्षेत्राची वेगळी ओळख निर्माण होईल. संरक्षण क्षेत्राच्या लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असेल आणि देशाचा सामान्यातला सामान्य नागरिक, मग तो सीमेवर प्रहरी असेल अथवा आपल्या भागात, गल्लीमध्ये प्रहरी असेल, त्याच्याकडे एकाच नजरेने पाहिले जाईल. आणि देशाच्या रक्षणासाठी समाज आणि व्यवस्था, दोन्ही मिळून काम करीत असतील. ज्यावेळी देश स्वातंत्र्याचे शतक साजरे करेल, त्यावेळी मोठ्या ताकदीने तुम्ही उभे असाल. याच विश्वासाबरोबर मी सर्व नवजवनांना अनेक-अनेक शुभेच्छा देतो. त्यांच्या कुटुंबियांना खूप-खूप शुभेच्छा देतो.

खूप-खूप धन्यवाद !!

 

S.Kane/R.Aghor/S.Bedekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1805541) Visitor Counter : 372