आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 180 कोटी 13 लाखांहून अधिक मात्रा देण्याचे काम पूर्ण


गेल्या 24 तासात, कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 20 लाख 31 हजारांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.71%

गेल्या 24 तासात देशात 3,116 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 38,069

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.50% आहे

Posted On: 13 MAR 2022 12:20PM by PIB Mumbai

 

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 20 लाख 31 हजारांहून अधिक (20,31,275) मात्रा देण्यात आल्यामुळे आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 180 कोटी 13 लाखांचा (180,13,23,547) टप्पा ओलांडला आहे.

देशभरात 2,10,85,852 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,02,622

2nd Dose

99,84,407

Precaution Dose

43,10,000

FLWs

1st Dose

1,84,11,428

2nd Dose

1,74,76,822

Precaution Dose

65,48,262

Age Group 15-18 years

1st Dose

5,58,71,085

2nd Dose

3,37,70,605

Age Group 18-44 years

1st Dose

55,33,11,626

2nd Dose

45,52,01,014

Age Group 45-59 years

1st Dose

20,25,29,223

2nd Dose

18,27,29,190

Over 60 years

1st Dose

12,65,89,403

2nd Dose

11,38,07,410

Precaution Dose

1,03,80,450

Precaution Dose

2,12,38,712

Total

1,80,13,23,547

 

गेल्या 24 तासात 5,559 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,24,37,072 झाली आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.71% आहे.

गेल्या 24 तासात, देशात 3,116 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली.

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 38,069 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.09% आहे.

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेच्या विस्ताराचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 7,61,737 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 77 कोटी 85 लाखांहून अधिक (77,85,20,151) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविण्यात आली असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.50% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 0.41%.इतका आहे.

***

S.Tupe/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1805501) Visitor Counter : 220