आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 179 कोटी 91 लाखांहून अधिक मात्रा देण्याचे काम पूर्ण


गेल्या 24 तासात, कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 18 लाख 18 हजारांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.71%

गेल्या 24 तासात देशात 3,614 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 40,559

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.52% आहे

Posted On: 12 MAR 2022 10:28AM by PIB Mumbai

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 18 लाख 18 हजारांहून अधिक (18,18,511) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 179 कोटी 91 लाखांचा (1,79,91,57,486) टप्पा ओलांडला आहे.

देशभरात 2,10,32,993 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,02,528

2nd Dose

99,83,044

Precaution Dose

42,99,668

FLWs

1st Dose

1,84,11,281

2nd Dose

1,74,74,281

Precaution Dose

65,26,610

Age Group 15-18 years

1st Dose

5,57,96,876

2nd Dose

3,33,42,579

Age Group 18-44 years

1st Dose

55,31,82,397

2nd Dose

45,42,13,529

Age Group 45-59 years

1st Dose

20,25,01,441

2nd Dose

18,24,75,997

Over 60 years

1st Dose

12,65,74,331

2nd Dose

11,36,47,733

Precaution Dose

1,03,25,191

Precaution Dose

2,11,51,469

Total

1,79,91,57,486

 

गेल्या 24 तासात 5,185 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,24,31,513 झाली आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.71% आहे.

गेल्या 24 तासात, देशात 3,614 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली.

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 40,559 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.09% आहे.

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेच्या विस्ताराचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 8,21,122 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 77 कोटी 77 लाखांहून अधिक (77, 77,58,414) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविण्यात आली असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.52% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 0.44%.इतका आहे.

***

ST/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1805311) Visitor Counter : 164