कोळसा मंत्रालय

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोळसा मंत्रालयाचा आयकॉनिक वीक महोत्सव


विविध कार्यक्रमांसह आज समारोप

Posted On: 11 MAR 2022 3:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मार्च 2022

नवी दिल्ली येथे आयोजित कोळसा मंत्रालयाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयकॉनिक वीक सोहळ्याची आज विविध कार्यक्रमांनी सांगता होणार आहे.

डॉ. वैभव चतुर्वेदी यांचे “शून्य उत्सर्जन धेयाअंतर्गत भारतातील ऊर्जा प्रणालींचे भविष्य” या विषयावर भाषण, “कोळसा आणि हवामान बदल – भारतीय दृष्टीकोन” या विषयावर मंत्रालय आणि सार्वजनिक उपक्रमांच्या कर्मचाऱ्यांसाठी घोषणा स्पर्धा हे समारोपाच्या दिवसाच्या कार्यक्रमांमधील काही ठळक मुद्दे आहेत. कोळसा मंत्रालयाचे सचिव डॉ. अनिल कुमार जैन समारोप सोहोळ्याला संबोधित करतील आणि विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करतील.

7 मार्च 2022 रोजी नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे एका दिमाखदार समारंभात कोळसा, खाणी आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते आठवडाभर चालणाऱ्या या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. कोल इंडिया लिमिटेड आणि एनएलसी इंडिया लिमिटेड यांच्या शाश्वत खाणकाम विषयावरील लघुपटांचे प्रदर्शन, कोळसा आणि संबंधित क्षेत्रातील तज्ञांची भाषणे, रक्तदान शिबिरे इत्यादी कोळसा मंत्रालयाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयकॉनिक वीक सोहळ्याची काही ठळक वैशिष्ट्ये होती.


JPS/VJ/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1805057) Visitor Counter : 293