भारतीय निवडणूक आयोग
विजयी उमेदवारांच्या मिरवणुकांशी संबंधित मार्गदर्शक सूचना
Posted On:
10 MAR 2022 6:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 10 मार्च 2022
भारतीय निवडणूक आयोगाने 8 जानेवारी 2022रोजी देशातील गोवा,मणिपूर,पंजाब,उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या विधानसभा क्षेत्रांमध्ये निवडणुका जाहीर केल्या. निवडणुकीच्या घोषणेसोबतच, आयोगाने कोविड काळात विजयी मिरवणुकीसह निवडणुकीशी संबंधित विविध बाबींचे नियमन करण्यासाठी सुधारित विस्तारित मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या. निवडणूक प्रक्रियेच्या काळात कोविड विषयक परिस्थितीत हळूहळू सुधारणा होत असताना आयोगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्य सरकारे यांच्याशी विचार विनिमय करून निवडणुकीसंदर्भातील काही निर्बंध शिथिल केले आहेत.
निवडणुका होत असलेल्या राज्यांमध्ये कोविड संसर्गाची सद्यस्थिती लक्षात घेऊन, आयोगाने मतमोजणी सुरु असताना आणि पूर्ण झाल्यानंतर विजयी उमेदवारांच्या मिरवणुकांशी संबंधित नियम शिथिल करण्याचा तसेच या मिरवणुकांवर घातलेली संपूर्ण बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेले निर्देश आणि संबंधित जिल्हा प्रशासनाने लागू केलेले प्रतिबंधात्मक उपाय विचारात घेतल्यानंतरच नियमांमध्ये ही शिथिलता आणली जाईल.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1804831)
Visitor Counter : 299