मंत्रिमंडळ
भारतात जागतिक आरोग्य संघटनेचे जागतिक पारंपरिक औषध केंद्र स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
09 MAR 2022 3:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्यात यजमान देश करारावर स्वाक्षरी करून गुजरातमधील जामनगर येथे जागतिक आरोग्य संघटनेचे जागतिक पारंपरिक औषध केंद्र (WHO GCTM) स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.
WHO GCTM ची स्थापना आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत जामनगरमध्ये केली जाईल. जगभरातील पारंपारिक औषधांसाठी हे पहिले आणि एकमेव जागतिक केंद्र (कार्यालय) असेल.
फायदे:
i. जगभरात आयुष पद्धती स्थापित करणे .
ii. पारंपरिक औषधांशी संबंधित जागतिक आरोग्य विषयांवर नेतृत्व प्रदान करता येईल.
iii. गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकता, प्रवेश आणि पारंपारिक औषधांचा तर्कसंगत वापर सुनिश्चित करण्यासाठी.
iv. डेटा उपक्रम विश्लेषणे गोळा करण्यासाठी आणि परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी संबंधित तांत्रिक क्षेत्रांमध्ये, साधने आणि पद्धतींमध्ये मानदंड, मानके आणि मार्गदर्शक तत्त्वे विकसित करणे. विद्यमान टेलिमेडिसिन डेटा बँक, आभासी ग्रंथालये आणि शैक्षणिक आणि संशोधन संस्थांचे सहयोगी तयार करणारे WHO TM माहिती विज्ञान केंद्राची परिकल्पना करणे.
v.उद्दिष्टांशी सुसंगत असलेल्या क्षेत्रात विशिष्ट क्षमता निर्माण आणि प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करणे आणि कॅम्पस, निवासी किंवा वेब-आधारित आणि जागतिक आरोग्य संघटना अकादमी आणि इतर धोरणात्मक हितधारकांसह भागीदारीद्वारे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अदनोम घेबेरेयस यांनी भारताच्या माननीय पंतप्रधानांच्या उपस्थितीत 13 नोव्हेंबर 2020 रोजी 5 व्या आयुर्वेद दिनानिमित्त भारतात WHO GCTM ची स्थापना करण्याची घोषणा केली. माननीय पंतप्रधानांनी WHO च्या या उपक्रमाची प्रशंसा केली आणि नमूद केले की WHO GCTM जागतिक आरोग्य केंद्र म्हणून उदयास येईल, पुराव्यावर आधारित संशोधन, प्रशिक्षण आणि पारंपरिक औषधांबद्दल जागरूकता वाढवेल.
समन्वय, अंमलबजावणी आणि उपक्रमांवर देखरेख ठेवण्याकरिता या केंद्राच्या स्थापनेसाठी एक संयुक्त कृती दलाची (JTF) निर्मिती करण्यात आली आहे. संयुक्त कृती दलामध्ये भारत सरकार, भारताचे स्थायी मिशन, जिनिव्हा आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. निवडक तांत्रिक उपक्रम आणि पूर्णपणे कार्यरत WHO GCTM च्या नियोजनासाठी या अंतर्गत, ITRA, जामनगर, गुजरात येथे एक हंगामी कार्यालय स्थापन केले जात आहे.
आयुर्वेद आणि युनानी प्रणालीचे प्रशिक्षण आणि सराव यावर प्रमाणित दस्तऐवज विकसित करणे, रोगांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण-11 च्या पारंपरिक औषध प्रकरणातील दुसरे मॉड्यूल सादर करणे, एम-योगासारखे अॅप विकसित करणे, इंटरनॅशनल फार्माकोपिया ऑफ हर्बल मेडिसिन (आयपीएचएम) आणि इतर संशोधन अभ्यास इ. च्या कार्यास समर्थन देणे यासह अनेक आघाड्यांवर आयुष मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेसोबत सहकार्य केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने आगामी WHO-GCTM आणि इतर विविध उपक्रम जगभरात पारंपरिक औषध क्षेत्रात भारताला अग्रस्थानी राखण्यासाठी मदत करतील.
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1804391)
Visitor Counter : 516
Read this release in:
Urdu
,
English
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam