श्रम आणि रोजगार मंत्रालय

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष मोहीम राबवल्याबद्दल कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संघटना (ईपीएफओ) ​​आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचे (ईएसआयसी) केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी केले कौतुक


ईपीएफओ आणि ईएसआयसीद्वारे महिलांचे सर्व दावे निकाली काढत, महिला सक्षमीकरण डेस्क सुरू करून कामगार मंत्रालयाने साजरा केला महिला दिन

Posted On: 09 MAR 2022 11:09AM by PIB Mumbai


आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सव सप्ताहाचे औचित्य साधत, कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे दोन प्रमुख घटक ईपीएफओ ​​आणि ईएसआयसी तसेच खाण सुरक्षा महासंचालनालयाने (डीजीएमएस) मिळून महिलांचे सर्व दावे निकाली काढण्यासाठी महिला-अनुकूल पद्धतशीर उपाययोजनांची मालिका राबवली. या अंतर्गत महिला भागधारकांना एकाच ठिकाणी सर्व सेवा प्रदान करण्यासाठी अशा प्रकारचे पहिलेच "महिला सक्षमीकरण डेस्क" सुरु केले.

ईपीएफओ, ईएसआयसी आणि डीजीएमएसने संयुक्तपणे "महिला कार्यशक्तीचे मूल्य आणि सक्षमीकरण" या संकल्पनेवर काल एक कार्यक्रम आयोजित केला होता. कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव, कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली,  कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव, सुनील बर्थवाल, केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त नीलम शमी राव, ईएसआयसीचे महासंचालक एम एस भाटिया आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सरकारचे नागरिक-केंद्रित चेहरे असलेल्या ईपीएफओ ​​आणि ईएसआयसी यांनी राबवलेल्या अनोख्या उपक्रमांचे भूपेंद्र यादव यांनी यावेळी कौतुक केले.  “ईपीएफओ विश्वासाचे प्रतीक आहे, तर ईएसआयसी सर्वोत्तम सेवांद्वारे स्वतःला सिद्ध करते”.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत, ईपीएफओ​​ने 75 लाख ई-नामांकनांचे लक्ष्य ठेवले असून विशेषत: महिला दिनानिमित्त, त्यांनी महिला कर्मचाऱ्यांना त्यांचे ई-नामांकन दाखल करण्याची मोहीम चालवली आहे. ईपीएफओने 92 लाखांचा टप्पा गाठून आपले लक्ष्य पार केले आहे.

आठवडाभर चालणाऱ्या या विशेष मोहिमेत महिला सदस्यांच्या ई-नामांकनांना गती देण्याचा प्रयत्नही करण्यात आला. आस्थापनांच्या सहकार्याने ईपीएफओच्या क्षेत्रीय कार्यालयांद्वारे विशेष शिबिरांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत सक्रियपणे पोहोचण्याचा प्रयत्न केला.  मोहिमेला प्रतिसाद देत 10415 आस्थापनांनी त्यांच्या महिला कर्मचार्‍यांची 100% ई-नामांकने नोंदवली. एकूण 7 लाख ई-नामांकने देशातील आघाडीच्या केवळ 100 आस्थापनांमधून महिला सदस्यांनी दाखल केली होती.

आणखी एका मोहिमेत, 5 मार्च 2022 पर्यंत सर्व महिलांच्या दाव्यांवर प्रक्रिया करण्याचे लक्ष्य ठेवले होते. मार्चमधे संपलेल्या या उपक्रमाने एका आठवडाभराच्या मोहिमेत, महिलांचे एकूण 638 कोटी रुपयांचे 144069 दावे निकाली काढले.

चेन्नई, बेंगळुरू, कोलकाता, दिल्ली आणि मुंबई येथे "महिला सक्षमीकरण डेस्कचे" मंत्री महोदयांनी आज लोकार्पण केले. ईपीएफओसोबत सर्व महिला भागधारकांशी संवाद साधणारे हे पहिले महिला सक्षमीकरण डेस्क आहे.

मंत्री महोदयांनी ईएसआयसीच्या 3 महिला कोरोना योद्ध्यांना मान्यता पुरस्कारांचे वितरण देखील केले.  त्यांनी भारतात पहिल्यांदाच खाणकाम करणाऱ्या 4 महिला खाण कामगारांचाही सत्कार केला.

***

SonalTupe/VinayakGhode/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1804276) Visitor Counter : 232