आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 179.33 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


गेल्या 24 तासात 18.69 लाख मात्रांचे लसीकरण

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.69%,

गेल्या 24 तासात 4,575 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 46,962

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.62%

Posted On: 09 MAR 2022 9:39AM by PIB Mumbai

गेल्या 24 तासात  18.69  (18,69,103)  लाख मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताने 179.33 (1,79,33,99,555)  कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. 2,08,48,528 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,02,292

2nd Dose

99,78,958

Precaution Dose

42,68,734

FLWs

1st Dose

1,84,10,832

2nd Dose

1,74,66,501

Precaution Dose

64,41,480

Age Group 15-18 years

1st Dose

5,55,80,872

2nd Dose

3,20,34,392

Age Group 18-44 years

1st Dose

55,28,59,320

2nd Dose

45,16,84,524

Age Group 45-59 years

1st Dose

20,24,50,051

2nd Dose

18,18,71,562

Over 60 years

1st Dose

12,65,40,606

2nd Dose

11,32,63,060

Precaution Dose

1,01,46,371

Precaution Dose

2,08,56,585

Total

1,79,33,99,555

 

गेल्या 24 तासांत 7,416 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,24,13,566 झाली आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.69% झाला आहे. 


 

गेल्या 24 तासात 4,575 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 

 

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या  46,962 आहे.  देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.11% आहे. 

 

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 8,97,904  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 77.52  (77,52,08,471) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.62% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.51% आहे.

****

Jaydevi PS/ VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1804245) Visitor Counter : 169