आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 179.13 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


गेल्या 24 तासात लसीच्या 21.34 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.68%

गेल्या 24 तासात 3,993 नव्या रुग्णांची नोंद

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 49,948

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.68%

Posted On: 08 MAR 2022 9:26AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालानुसार, गेल्या 24 तासात लसीच्या 21.34 लाखांहून अधिक (21,34,463) मात्रा देणे पूर्ण करत भारतातील कोविड-19  प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 179.13 कोटी (1,79,13,41,295) मात्रांचा टप्पा पार केला आहे.


एकूण 2,08,07,099 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,02,230

2nd Dose

99,77,592

Precaution Dose

42,58,154

FLWs

1st Dose

1,84,10,719

2nd Dose

1,74,63,730

Precaution Dose

64,26,046

Age Group 15-18 years

1st Dose

5,54,96,520

2nd Dose

3,15,16,231

Age Group 18-44 years

1st Dose

55,27,40,302

2nd Dose

45,08,05,644

Age Group 45-59 years

1st Dose

20,24,31,362

2nd Dose

18,16,66,469

Over 60 years

1st Dose

12,65,28,642

2nd Dose

11,31,35,305

Precaution Dose

1,00,82,349

Precaution Dose

2,07,66,549

Total

1,79,13,41,295

 

गेल्या 24 तासात 8,055 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून) 4,24,06,150 झाली आहे.


परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा दर 98.68% इतका आहे.


गेल्या 24 तासात 3,993 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.


भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 49,948 आहे. देशात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.12% आहे.


देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे. गेल्या 24 तासात एकूण 8,73,395 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 77.43 कोटींपेक्षा जास्त (77,43,10,567) चाचण्या केल्या आहेत.


देशभरात चाचणी क्षमता वाढवली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.68% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.46%. नोंदविण्यात आला आहे

***

ST/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1803819)