नागरी उड्डाण मंत्रालय

युक्रेनच्या शेजारच्या देशांतून 1300 पेक्षा जास्त भारतीयांना आज विशेष नागरी विमानांनी मायदेशी परत आणले


आत्तापर्यंत 17,400 पेक्षा जास्त भारतीयांना विशेष विमानांनी मायदेशी परत आणले आहे

Posted On: 07 MAR 2022 6:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 मार्च 2022

 

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन गंगा‘ अंतर्गत आज युक्रेनच्या शेजारील देशांमधून 7 विशेष नागरी विमानांनी 1,314 भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आले. यामुळे दिनांक 22 फेब्रुवारी 2022 पासून भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी पाठविण्यात आलेल्या विशेष विमानांद्वारे आत्तापर्यंत, 17 हजार 400 पेक्षा जास्त भारतीयांना मायदेशी आणण्यात  आले आहे. 73 विशेष नागरी उड्डाणे करून मायदेशी आणलेल्या भारतीयांची संख्या आता 15,206 झाली आहे.  

C-17 हे भारतीय हवाई दलाचे विमान 201प्रवाशांना घेऊन आज संध्याकाळी मायदेशी परतत आहे. याआधी ‘ऑपरेशन गंगा‘ अंतर्गत भारतीय हवाई दलाने 10 विमानांतून 2056 प्रवाशांना परत आणले आहे.

आजच्या विशेष नागरी उड्डाणापैकी 4 विमाने नवी दिल्ली येथे उतरविण्यात  आली तर दोन विमाने मुंबई येथे पोहोचली. एक विमान संध्याकाळी उशीरा परतण्याची शक्यता आहे. यामध्ये बुडापेस्ट येथून 5, बुखारेस्ट येथून एक  आणि सुचोव्हा येथून एक विमाननाच समावेश आहे.  

सुचोवा येथून उद्या 2 विशेष नागरी विमानानी 4,00 पेक्षा जास्त भारतीयांना मायदेशी आणण्याची अपेक्षा आहे.

 
* * *

N.Chitale/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1803669) Visitor Counter : 203