कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
"इमॅजिनिंग इंडिया@2047 थ्रू इनोवेशन्स" या विषयावरील 3 दिवसीय परिसंवादाचे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह उद्घाटन करणार
Posted On:
06 MAR 2022 7:53PM by PIB Mumbai
चेन्नई येथे 07-09 मार्च 2022 या कालावधीत “इमॅजिनिंग इंडिया@2047 थ्रू इनोवेशन्स" या विषयावर आधारित तीन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. आयआयटी मद्रासच्या सहकार्याने प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाद्वारे (डीएआरपीजी) या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. चेन्नई येथील आयआयटीएम रिसर्च पार्क येथे हा परिसंवाद होणार आहे.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह 8 मार्च 2022 रोजी या परिसंवादाचे उद्घाटन करतील.
"कमाल प्रशासन, किमान शासन" या धोरणात्मक उद्दिष्टासह, आधुनिक सुधारणा आणि नवोन्मेष, सरकारी प्रक्रियांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, रि-इंजिनिअरिंगचा समावेश, ई-सेवांमध्ये सार्वत्रिक प्रवेश,जिल्हा स्तरावर डिजिटल उपक्रमांमध्ये उत्कृष्टता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा अवलंब करणे तसेच माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान व्यवस्थापनाचा वापर करण्यासंदर्भातील उत्कृष्टता यासाठी सरकार आणि नागरिकांना एकत्र आणण्याचा या परिसंवादाच्या माध्यमातून प्रयत्न आहे.
न्यूक्लियस आणि सेल चमूसाठी सुमारे 200 सहभागी निवडले जातील त्यात एक भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, विद्याशाखेतील एक तरुण सदस्य आणि एक तरुण उद्योजक यांचा समावेश असून ते एकत्र बसून चर्चा करतील. अशा 10 सेल्स चमू असतील. न्यूक्लियस चमूतील 4 सदस्य या परिसंवादादरम्यान मुख्य तज्ज्ञ असतील.आणि ते पुढील वीस वर्षांच्या दृष्टीने, भारताला कशाप्रकारे पुढे घेऊन जायला हवे या अनुषंगाने चर्चा करतील. भारताला भेडसावत असलेली समस्या क्षेत्र आणि पुढील पंचवीस वर्षात लक्षणीय प्रगती आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा, ऊर्जा, पाणी, कृषी, शिक्षण, आरोग्य सेवा, शहरी गृहनिर्माण यांसारख्या क्षेत्रांसंदर्भातील 10 वेगवेगळ्या विषयांवरील एक समस्या प्रत्येक सेलना चर्चेसाठी दिली जाईल. 'डिजिटल प्रशासनामधील नवोन्मेष ' ही संकल्पना असेल.
***
S.Patil/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1803386)
Visitor Counter : 208