नागरी उड्डाण मंत्रालय
युक्रेनच्या शेजारच्या देशांतून 2100 पेक्षा जास्त भारतीयांना विशेष विमानांनी मायदेशी आणले
आत्तापर्यंत 15,900 पेक्षा जास्त भारतीयांना विशेष विमानांनी मायदेशी आणले
प्रविष्टि तिथि:
06 MAR 2022 5:03PM by PIB Mumbai
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन गंगा‘ अंतर्गत आज युक्रेनच्या शेजारी देशांमधून 11 नागरी विमानांनी 2,135 भारतीय मायदेशी परतले. यांच्यासह आत्तापर्यंत 15 हजार 900 पेक्षा जास्त भारतीयांना ऑपरेशन गंगा सुरू झाल्यापासून भारतात परत आणण्यात आले आहे. दि. 22 फेब्रुवारी, 2022 पासून विमानांची 66 विशेष नागरी उड्डाणे करून मायदेशी आणलेल्या भारतीयांची संख्या आता 13,852 झाली आहे. भारतीय हवाई दलाने आत्तापर्यंत 10 उड्डाणे केली असून 2,056 प्रवाशांना परत आणले आहे. या मोहीमेचा एक भाग म्हणून या देशांना 26 टन मदत सामग्री- साहित्य देण्यात आले आहे.
आजच्या विशेष नागरी उड्डाणापैकी 9 विमाने नवी दिल्ली येथे उतरविण्यात आली तर दोन विमाने मुंबई येथे आली. बुडापेस्ट येथून सहा, बुखारेस्ट येथून दोन आणि झेझोव्ह येथून दोन आणि कोशिचे येथून एक विमान भारतीयांना घेवून मायदेशी आले.
उद्या आठ विशेष नागरी विमाने युक्रेनच्या शेजारी देशांतून आणखी काही भारतीयांना घेवून येतील असे अपेक्षित आहे. यामध्ये बुडापेस्ट (5), सुचोवा (2) आणि बुखारेस्ट (1) येथून 1,500 पेक्षा जास्त भारतीयांना मायदेशी परत आणतील, अशी अपेक्षा आहे.
***
S.Patil/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1803358)
आगंतुक पटल : 259