पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

शिवकुमार पारीक यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

प्रविष्टि तिथि: 06 MAR 2022 9:30AM by PIB Mumbai

माजी पंतप्रधान अटलबिहारीने वाजपेयी यांचे दीर्घकाळ सहकारी राहिलेले शिवकुमार पारीक यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले  आहे.


ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले,

"शिवकुमार पारीक जी यांच्या निधनामुळे दु:ख झाले. आपल्या पक्षाच्या विचारसरणीशी त्यांची घट्ट नाळ होती, त्यांनी स्वत:ला सेवा, राष्ट्र उभारणीच्या कार्यात वाहून घेतले आणि अटलजींच्या सोबत राहून  काम केले. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती."

***

ST/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1803288) आगंतुक पटल : 273
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam