रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कवच प्रणालीच्या चाचणीची  केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून पाहणी


'कवच' - रेल्वेच्या परिचालनात सुरक्षितता वाढवण्यासाठी एक स्वदेशी स्वयंचलित  संरक्षण प्रणाली

Posted On: 04 MAR 2022 9:58PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागातील लिंगमपल्ली-विकराबाद मार्गावरील गुल्लागुडा-चितगिड्डा रेल्वे स्थानकांदरम्यान कवचकार्यप्रणालीच्या चाचणीची पाहणी केली.

FM_HTJmaIAEgN-5.jpg

केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत कवचची सखोल चाचणी घेण्यात आली.

चाचणी दरम्यान, दोन्ही दिशेने गाड्या एकमेकांसमोर आणण्यात आल्या, इंजिने समोरासमोर आणून टक्कर होण्यासारखी स्थिती निर्माण करण्यात आली. 'कवच' प्रणालीने स्वयंचलित ब्रेकिंग प्रणाली सुरू केली आणि गाड़ी 380  मीटर अंतरावर थांबवली. . तसेच, लाल  सिग्नल ओलांडण्याची चाचणी घेण्यात आली; मात्र गाडीने लाल सिग्नल ओलांडला नाही कारण 'कवच' मध्ये आपोआप ब्रेक लागणे  आवश्यक होते.

कवच ही भारतीय उद्योगांच्या सहकार्याने रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO) ची  स्वदेशी विकसित एटीपी प्रणाली आहे आणि भारतीय रेल्वेच्या परिचालनात सुरक्षेचे  उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे चाचण्या करण्यात मदत करत आहे.  ही चार स्तरीय सुरक्षा विषयक मानकांची अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे

कवचचा उद्देश गाडयांना धोकादायक लाल (रेड) सिग्नल ओलांडणे  आणि टक्कर टाळण्यासाठी प्रतिबंधित करून संरक्षण प्रदान करणे हा आहे. वेगाच्या निर्बंधांनुसार चालक गाडी  नियंत्रित करू शकला नाही तर ते ट्रेन ब्रेकिंग सिस्टम स्वयंचलितपणे सक्रिय करते. याव्यतिरिक्त, हे कवच  प्रणालीसह सुसज्ज असलेल्या दोन गाड्यांची  टक्कर प्रतिबंधित करते.

'कवच' हे सर्वात स्वस्त, सुरक्षित (SIL-4) प्रमाणित तंत्रज्ञानांपैकी एक आहे. तसेच, यामुळे रेल्वेसाठी या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या निर्यातीचे मार्ग खुले झाले आहेत.

 

कवचची वैशिष्ट्ये

1. धोकादायक  सिग्नल ओलांडण्यास  प्रतिबंध (SPAD)

2. ड्रायव्हर मशीन इंटरफेस (DMI) / लोको पायलट ऑपरेशन कम इंडिकेशन पॅनेल (LPOCIP) मध्ये सिग्नल बाबत  नियमित अद्ययावत माहिती

3. ओव्हर स्पीडिंगच्या प्रतिबंधासाठी स्वयंचलित ब्रेकिंग प्रणाली

4. लेव्हल क्रॉसिंग गेट्स जवळ येत असताना स्वयंचलित  शिटी वाजणार

5. कवच प्रणालीने ने सुसज्ज असलेल्या दोन गाड्यांची टक्कर रोखणे

6. आपत्कालीन परिस्थितीत SoS संदेश

7. नेटवर्क मॉनिटर सिस्टमद्वारे गाड्यांच्या हालचालींवर थेट निरीक्षण.

 

भारतीय रेल्वेवर कवच वापरण्याबाबत धोरण:

96% रेल्वे वाहतूक भारतीय रेल्वे अधिक लोकसंख्या आणि अधिक प्रमाणात वापरल्या जाणार्‍या नेटवर्क मार्गांवरून होते. वाहतूक सुरक्षितपणे व्हावी यासाठी  रेल्वे बोर्डाने ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार कवचची कामे हाती घेतली जात आहेत.

  • प्रथम प्राधान्य : अधिक लोकसंख्या असलेले मार्ग  आणि नवी दिल्ली - मुंबई आणि नवी दिल्ली - हावडा मार्गावर ताशी  160 किमी साठी  स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग आणि मध्यवर्ती  वाहतूक नियंत्रण . अशा मार्गांवर  वाहनचालकांच्या मानवी चुकांमुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते
  • दुसरे प्राधान्य : स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग आणि मध्यवर्ती  वाहतूक नियंत्रणासह अधिक वापरल्या  जाणार्‍या मार्गावर
  • तिसरे  प्राधान्य: स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंगसह इतर उच्च प्रवासी संख्या असलेल्या  मार्गांवर.
  • चौथे  प्राधान्य : इतर सर्व मार्ग.

आत्मनिर्भर भारतचा एक भाग म्हणून, 2022-23 मध्ये सुरक्षा आणि क्षमता वाढीसाठी 2,000 किमी नेटवर्क कवच अंतर्गत आणले जाईल. कवच अंतर्गत सुमारे 34,000 किलोमीटरचे नेटवर्क आणले जाईल

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1803086) Visitor Counter : 305