रसायन आणि खते मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डॉ. मनसुख मांडविया यांनी नवी दिल्लीतील पुराना किल्ला इथल्या आरोग्य वारसा फेरीत घेतला सहभाग


जनऔषधी दिवसानिमित्त आयोजित सप्ताह सोहळ्याच्या चौथ्या दिवशी “जनऔषधी जन जागरण अभियान- आरोग्य वारसा फेरीचे” आयोजन

Posted On: 04 MAR 2022 3:21PM by PIB Mumbai

 

नवी दिल्लीतील पुराना किल्ला इथल्या आरोग्य वारसा फेरीमधे आज केंद्रीय आरोग्य, रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि इतर मान्यवर सहभागी झाले. चालण्यामुळे आरोग्याला होणारे फायदे आणि जन औषधी जेनेरिक औषधांबद्दल याद्वारे  जागरूकता निर्माण करण्यात आली.

जनऔषधी दिनानिमित्त आयोजित  सप्ताह सोहळ्याच्या चौथ्या दिवशी, 9 शहरांमध्ये 10 ठिकाणी आरोग्य वारसा फेरीचे आयोजन करण्यात आले. चालणे, तसेच शारीरिक व्यायाम करुन आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा आणि जनऔषधी केन्द्रांवर उपलब्ध दर्जेदार तसेच स्वस्त जेनेरिक औषधांचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

भारतीय औषध निर्माण आणि वैद्यकीय उपकरणे ब्युरो (फार्मास्युटिकल्स अँड मेडिकल डिव्हायसेस ब्युरो ऑफ इंडिया, पीएमबीआय) 1 मार्च 2022 पासून आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करून जनऔषधी दिवस साजरा करत आहे.  याअंतर्गत पीएमबीआयने देशभरात जनऔषधी संकल्प यात्रा, मातृशक्ती सन्मान आणि जन औषधी बाल मित्रचे अनुक्रमे 1 मार्च, 2 मार्च आणि 3 मार्च 2022 रोजी आयोजन केले.

भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या  अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रगतीशील भारताच्या 75  वर्षांचा, इथल्या लोकांचा, संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करण्याचा तसेच त्याचे स्मरण करण्याचा हा केन्द्र सरकारचा एक उपक्रम आहे. 

***

N.Chitale/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1802934) Visitor Counter : 197