इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
एनआयसी टेक परिषद 2022 चे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री, राजीव चंद्रशेखर यांनी केले उद्घाटन
Posted On:
04 MAR 2022 9:16AM by PIB Mumbai
राष्ट्रीय माहिती केंद्राने (नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर, एनआयसी) #TechConclave2022 चे आयोजन केले आहे. यात विशेषत: ई-प्रशासनामध्ये लागू होणाऱ्या उदयोन्मुख तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले आहे. “डिजिटल सरकारसाठी भविष्यातील तंत्रज्ञान” अशी याची संकल्पना आहे.
सरकार आणि प्रशासनामध्ये तंत्रज्ञान रुजवण्यात एनआयसी महत्त्वाची भूमिका बजावते असे कार्यक्रमाला संबोधित करताना राजीव चंद्रशेखर म्हणाले. ते पुढे म्हणाले की, सरकारसाठी, तंत्रज्ञानाच्या भविष्यासाठी अपेक्षित नियोजन हे एनआयसीच्या डीएनएमध्येच अंतर्भूत आहे.
आझादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधत, राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी #75DigitalSolutionsfromNIC नावाचे ईबुक प्रकाशित केले. नागरिक, व्यवसाय आणि सरकार यांच्यासाठी एनआयसीने विकसित केलेल्या तंत्रज्ञान-आधारित उपायांच्या मदतीने डिजिटल परिवर्तनाद्वारे साध्य केलेल्या विविध सरकारी योजना आणि उपक्रमांचे फायदे ई-बुकमध्ये मांडले आहेत. ई-पुस्तक येथे उपलब्ध आहे: https://uxdt.nic.in/flipbooks/75-Digital-Solutions-from-NIC/
“सरकारमधे डिजिटल परिवर्तनाद्वारे नागरीकांचे सक्षमीकरण ” या एनआयसीच्या महासंचालक डॉ. नीता वर्मा यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशनही राज्यमंत्र्यांनी केले. हे पुस्तक देशव्यापी डिजिटल पायाभूत सुविधा आणि सेवां संदर्भात काम करणाऱ्या एनआयसी अधिकाऱ्यांचा दृष्टीकोन, त्यातून मांडलेल्या विविध क्षेत्रांतील तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखालील परिवर्तन आणि त्यांची उत्क्रांती यांचे विवेचन करते.
एनआयसीची टेक परिषद 2022 सरकारी मंत्रालये/विभागांच्या माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापकांना नवीनतम आयसीटी तंत्रज्ञानावर आणि उद्योगातील सर्वोत्तम पद्धतींवरील त्यांच्या वापर कार्यान्वयनांसाठी समृद्ध करेल. राज्य सरकारांच्या माहिती तंत्रज्ञान सचिवांना राज्यांमध्ये आणले जाऊ शकणारे नवीन तंत्रज्ञान आणि अनुप्रयोग अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी हे एक व्यासपीठ देखील प्रदान करेल.
***
ST/VG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1802885)
Visitor Counter : 213