नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
“शाश्वत विकासासाठी ऊर्जा” या विषयावरील वेबिनारच्या पूर्ण सत्राला पंतप्रधान संबोधित करणार
वेबिनारमध्ये तीन वेगवेगळ्या सत्रांचा समावेश आहे आणि त्यानंतर सहा संकल्पना-आधारित ब्रेकआउट सत्रे आहेत
एमएनआरई सौर उत्पादन आणि हरित हायड्रोजनवर भर देणारे "नवीकरणीय ऊर्जेची व्याप्ती वाढवणे" हे प्रमुख सत्र आयोजित करेल
Posted On:
03 MAR 2022 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2022
ऊर्जा; पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू; नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा; कोळसा; खाणी; परराष्ट्र व्यवहार; आणि पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयांचा समावेश असलेल्या संसाधनांवरील क्षेत्रीय गट 4 मार्च 2022 रोजी सकाळी 10 वाजता "शाश्वत विकासासाठी ऊर्जा" या विषयावर एक वेबिनार आयोजित करत आहे, ज्यामध्ये अर्थसंकल्प 2022 च्या घोषणांसह ऊर्जा आणि संसाधन क्षेत्रातील भारत सरकारच्या उपक्रमांबाबत चर्चा तसेच या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कल्पना आणि सूचना मांडल्या जातील.
वेबिनारमध्ये तीन वेगवेगळी सत्रे असतील. सकाळी 10 ते 10:30 दरम्यान पूर्ण सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील. या सत्रानंतर संकल्पना आधारित सहा ब्रेकआउट सत्रे होतील , जी सकाळी 10.30 ते दुपारी 12.45 पर्यंत होतील. दुपारी 2 ते 3: 10 या वेळेत होणाऱ्या समारोप सत्राचे अध्यक्ष , ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंह असतील
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (MNRE) "नवीकरणीय उर्जेची व्याप्ती वाढवणे " या विषयावर ब्रेकआउट सत्र आयोजित करेल, ज्याचे सूत्र संचालन नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव इंदू शेखर चतुर्वेदी करतील आणि सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील नामवंत वक्ते देखील सहभागी होतील. या सत्रात खालील दोन क्षेत्रांवर प्रामुख्याने भर दिला जाईल :
- सौर उत्पादन
- हरित हायड्रोजन
नव्या पिढीतील सोलर पीव्ही मॉड्यूल्स आणि मजबूत हायड्रोजन अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी अनुकूल परिसंस्था निर्माण करण्यासाठी हित धारक आणि उद्योजकांकडून सूचना मागवणे हे सत्राचे उद्दिष्ट आहे.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1802691)
Visitor Counter : 227