रसायन आणि खते मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जनऔषधी जेनेरिक औषधांच्या फायद्यांबाबत जनजागृती करणाऱ्या जनऔषधी रथ, फिरती जनऔषधी वाहने आणि जनऔषधी ई-रिक्षांना केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांनी झेंडा दाखवून केले रवाना


देशभरात आठवडाभर साजऱ्या होणाऱ्या जनौषधी दिवस सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी "मातृशक्ती सन्मान कार्यक्रम" आयोजित

Posted On: 02 MAR 2022 8:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 मार्च 2022

 

देशभरात आठवडाभर चालणाऱ्या जनौषधी दिवस सप्ताहाचा एक  भाग म्हणून,  भारत सरकारच्या रसायने आणि खते आणि   नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा  मंत्रालयाचे राज्यमंत्री  भगवंत खुबा यांनी जनौषधी रथ, फिरती  जनऔषधी वाहने आणि जनऔषधी ई-रिक्षांना झेंडा दाखवून  नवी दिल्ली येथून रवाना केले.

JA Rath Flag off-2.jpeg

जनऔषधी रथ 7 दिवसांमध्ये  4-5  राज्यांमध्ये फिरून आणि  फिरती  जनऔषधी वाहने आणि जनऔषधी ई-रिक्षा 7  मार्चपर्यंत दिल्लीत फिरून, सर्वांसाठी परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध असलेल्या परियोजना आणि जनऔषधी जेनेरिक औषधांच्या फायद्यांबाबत तळागाळात जनजागृती करतील.

Jaipur_Rajasthan.jpeg

जनऔषधी दिवस सप्ताहाच्या  दुसऱ्या दिवशी देशातील महिलांचा सन्मान करण्यासाठी देशभरात 75  ठिकाणी मातृशक्ती सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमादरम्यान महिलांना वापरता येतील अशा जनऔषधीच्या विविध वस्तू असलेल्या भेट्वस्तूचे  वितरण करण्यात आले.या कार्यक्रमांना महिला नेत्या, नगराध्यक्ष, लोकप्रतिनिधी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर महिला उपस्थित होत्या.

भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनिमित्त यंदाचे सर्व कार्यक्रम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत आयोजित केले जात आहेत.

 

* * *

N.Chitale/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1802442) Visitor Counter : 238