प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, भारत सरकार
2022 मधील केंद्रीय अर्थसंकल्पातील विज्ञान आणि तंत्रज्ञान
अंमलबजावणीच्या टप्प्यांबाबत चर्चा करण्यासाठी वेबिनार उद्योग, शैक्षणिक क्षेत्र आणि केंद्र सरकारच्या 16 मंत्रालये/विभागांना एकाच मंचावर आणणार
पंतप्रधान पूर्ण सत्राला संबोधित करणार
प्रविष्टि तिथि:
28 FEB 2022 10:51AM by PIB Mumbai
केंद्रीय अर्थसंकल्प 2022 अंतर्गत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणांची प्रभावी अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी केंद्र सरकार विविध क्षेत्रांसाठी वेबिनारची मालिका आयोजित करत आहे. ही वेबिनार मालिका संबंधित क्षेत्रांसाठी घोषित योजनांच्या अंमलबजावणीविषयक धोरणांबाबत चर्चा करण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रे, शैक्षणिक आणि उद्योगातील तज्ञांना एकाच मंचावर आणत आहे.
देशाच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने (PSA) भारत सरकारच्या अनेक विज्ञानाशी संबंधित मंत्रालये आणि विभागांसह 2 मार्च 2022 रोजी “तंत्रज्ञान-सक्षम विकास” या वेबिनारचे आयोजन केले आहे. वेबिनारच्या सुरुवातीला पंतप्रधान पूर्ण सत्राला संबोधित करतील. वेबिनारच्या दुसऱ्या भागात दूरसंचार विभाग (DoT), वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग
(DSIR), विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (DST)या विभागांची चार संकल्पना आधारित सत्रे होतील. या सत्रांमध्ये सरकारची विविध मंत्रालये आणि विभाग, शैक्षणिक आणि उद्योगातील प्रतिनिधी यांचा सहभाग असेल. या सत्रांमध्ये पुढील संकल्पनांवर भर दिला जाईल-
1.प्रमुख तंत्रज्ञान क्षेत्रातील विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रम
2.रोजगार निर्मिती / रोजगारक्षमता वाढवण्याच्या संधी
3.तंत्रज्ञान स्वयंपूर्णता
4.अमृत काल - भारत @2047 चे स्वप्न साकारण्यासाठी योजना
5. अनुपालन भार कमी करत प्रस्तावित कृती योजनेबाबत माहिती
वेबिनारच्या तिसर्या भागात वरील विभागांचे सचिव आणि मंत्री ब्रेकअवे सत्रांमधील कृती मुद्द्यांवर चर्चा करतील आणि अंमलबजावणीच्या दिशेने पुढील मार्ग आखतील .
https://events.negd.in/ येथे कार्यक्रमाची सविस्तर माहिती मिळेल.
***
JPS/SK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1801722)
आगंतुक पटल : 296