आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीया  यांनी केली राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम, 2022 ची सुरवात


पाच वर्षांखालील प्रत्येक मुलाला पोलिओची मात्रा दिली गेलीच पाहिजे: डॉ मनसुख मांडवीया

Posted On: 26 FEB 2022 3:20PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडवीया यांनी आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात पाच वर्षांखालील मुलांना पोलिओची मात्रा देऊन राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम 2022 ची सुरवात केली.

पोलिओविरुद्धचा भारताचा धोरणात्मक लढा म्हणजे लसीकरणाने टाळता येणाऱ्या  रोगांविरुद्धची भारताच्या सार्वजनिक आरोग्य सेवा धोरणाची  यशोगाथा आहे. आपण सतर्क राहून पाच वर्षांखालील एकही मुल पोलिओच्या मात्रेपासून वंचित राहणार नाही याची खात्री केली पाहिजे.असं मत मांडवीय यांनी यावेळी व्यक्त केले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम मुलांचे पूर्वीपेक्षा जास्त रोगांपासून संरक्षण करण्यावर भर देत आहे आणि यासाठी गेल्या काही वर्षांत न्युमोकॉकल काँज्यूगेट लस, रोटाव्हायरस लस आणि मिझल्स - रुबेला लस, आणल्या आहेत. याशिवाय मुलांना अधिक संरक्षण देण्यासाठी, भारत सरकारने इनअॅक्टिव्हेटेड पोलिओ लस इंजेक्शनचा नियमित लसीकरण कार्यक्रमात समावेश केला आहे. आपण अधिकाधिक रोगांपासून आपल्या मुलांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहोत, तेव्हा या कार्यक्रमात सर्व लसी देशातील प्रत्येक मुलापर्यंत पोहोचत आहेत, हे महत्वाचे आहे, डॉ मांडवीया  म्हणाले.

राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना, डॉ मांडवीया  म्हणाले, आपली मुले सुदृढ राहिली तरच निरोगी भारत मोहिमेचा उद्देश सफल होईल. अशा जीवघेण्या रोगांपासून आपल्या मुलांचे संरक्षण करणे हा मिशन इंद्रधनुष्य किंवा पोलिओ लसीकरण मोहिमेचा उद्देश आहे. कारण आपले शेजारी देश अजूनही पोलिओ मुक्त नाहीत, त्यामुळे आपण सतर्क राहून लसीकरण कार्यक्रम सुरु ठेवण्याची गरज आहे. येत्या काही महिन्यांत पाच वर्षांखालील 15 कोटींपेक्षा जास्त मुलांचे लसीकरण केले जाईल. एकही मुल वंचित राहू नये म्हणून सूक्ष्म स्तरावरील अतिशय भक्कम नियोजन आणि घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबविली जात आहे. पंतप्रधानांच्या अपेक्षेनुसार लसीकरण कार्यक्रम एक लोकचळवळ केल्याबद्दल  मी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे, जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, रोटरी क्लब आणि स्वयंसेवी संस्था यासारख्या हितसंबंधीयांचे अभिनंदन करतो. मी सर्व कुटुंबांना आवाहन करतो की त्यांने पुढे येऊन आपल्या मुलांचे लसीकरण करून घ्यावे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी या मोहिमेच्या उपलब्धी आणि भविष्यात राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम राबविण्याच्या योजनेविषयी माहिती दिली.

 

पोलिओ राष्ट्रीय लसीकरण मोहीम आणि पोलिओ राष्ट्रीय लसीकरण दिन 2022 विषयी:

रविवार, 27 फेब्रुवारी 2022 रोजी देशभर पोलिओ राष्ट्रीय लसीकरण दिन 2022 साजरा केला जाईल. भारतात देशाची पोलिओमुक्त स्थिती राखण्यासाठी आणि धोकादायक पोलिओ विषाणूपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी दरवर्षी एक देशव्यापी आणि दोन निम-देशव्यापी लसीकरण कार्यक्रम राबविले जातात. पोलिओ राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 735 जिल्ह्यातील 15 कोटी मुलांचा समावेश केला जाईल. या मोहिमेत, देशभरात सात लाख बुथ्सच्या माध्यमातून मुलांना पोलिओची मात्रा दिली जाईल. जवळपास 24 लाख स्वयंसेवक आणि 1.5 पर्यवेक्षक अंदाजे 23.6 कोटी घरांना भेटी देतील.

***

N.Chitale/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1801336) Visitor Counter : 484