शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शिक्षण मंत्रालयाची ‘भाषा प्रमाणपत्र सेल्फी’ मोहीम

Posted On: 25 FEB 2022 4:51PM by PIB Mumbai

 

एक भारत श्रेष्ठ भारतही भावना अधिक दृढ करण्यासाठी तसेच देशाच्या सांस्कृतिक विविधतेला आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण मंत्रालयाच्या वतीने भाषा प्रमाणपत्र सेल्फीमोहीम सुरू करण्यात आली आहे.

भाषा प्रमाणपत्र सेल्फीउपक्रमाचा उद्देश शिक्षण मंत्रालय आणि मायगव्हइंडियायांनी विकसित केलेल्या भाषा संगम मोबाइल अॅपला प्रोत्साहन देणे हा आहे. हे अॅप वापरून लोकांना देशातल्या सूचीबद्ध 22 भाषांमध्ये रोजच्या वापरत येणारी 100 पेक्षा अधिक वाक्ये शिकता येणार आहे. तसेच एक भारत श्रेष्ठ भारतया उपक्रमाच्या उद्दिष्टानुसार भारतीय भाषांमधून मूलभूत संभाषण कौशल्य आत्मसात करणे शक्य होणार आहे. या अॅपच्या माध्यमातून 75 लाख लोकांना मूलभूत संभाषण कौशल्य आत्मसात करता येईल, असे शिक्षण देण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.

भाषा प्रमाणपत्र सेल्फीया उपक्रमामुळे लोकांना #BhashaCertificateSelfie असा हॅशटॅग वापरून आपल्या समाज माध्यम खात्यांवरून प्रमाणपत्रासह सेल्फी अपलोड करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

शिक्षण मंत्रालयाकडून अधिकृत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी, वापरकर्त्याने अँडरॉईड आणि आयओएस अशा दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध असलेले मोबाइल अॅप डाउनलोड केले पाहिजे. त्यामध्ये देण्यात आलेल्या 22 सूचिबद्ध भारतीय भाषांमधून आपल्याला हवी असणारी भाषा निवडता येईल. परीक्षेचे सर्व स्तर पूर्ण करता येतील, त्यानंतर घेण्यात येणारी चाचणी परीक्षा देवून प्रमाणपत्र मिळवता येईल.

दरवर्षी दि. 31 ऑक्टोबर रोजी म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. या दिनानिमित्त शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भाषा संगम मोबाइल अॅप जारी केले होते.

अँडरॉइड फोनसाठी लिंक - : https://play.google.com/store/apps/details?id=com.multibhashi.mygov.mygov_app

आयओएस फोनसाठी लिंक - https://apps.apple.com/in/app/bhasha-sangam/id1580432719

***

R.Aghor/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1801192) Visitor Counter : 437