गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कोणताही नागरीक मागे राहता कामा नये’ या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला केले संबोधित


केंद्रीय अर्थसंकल्प 2022 ने पंतप्रधान आवास योजनेसारख्या विविध योजनांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी एक स्पष्ट पथदर्शी आराखडा तयार केला: पंतप्रधान

विशेष सत्रात ‘अमृतकाळामध्ये सर्वांसाठी घरे साकार करण्याविषयी’ ग्रामीण आणि शहरी गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ञांची चर्चा

Posted On: 23 FEB 2022 7:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 फेब्रुवारी 2022

 

केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 मध्ये घोषित केलेल्या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प 2022 नंतरच्या वेबिनारला संबोधित केले. या मालिकेतील हा दुसरा वेबिनार आहे. 
यावेळी संबंधित केंद्रीय मंत्री, राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित उपस्थित होते.

A group of people sitting around a tableDescription automatically generated with medium confidence

पंतप्रधानांनी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ चा प्रारंभी उल्लेख केला आणि हा मंत्र सरकारच्या सर्व धोरणांमागील  प्रेरणास्रोत असल्याचे सांगितले. "प्रत्येकाच्या प्रयत्नानेच आझादी का अमृत कालसाठीची आमची प्रतिज्ञा साकार होईल आणि प्रत्येक व्यक्ती, विभाग आणि क्षेत्राला विकासाचा पूर्ण लाभ मिळेल तेव्हाच प्रत्येकजण हा  प्रयत्न करू शकेल", असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान आवास योजना, ग्रामीण सडक योजना आणि जल जीवन मिशन यांसारख्या विविध योजनांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2022 ने एक स्पष्ट पथदर्शी आराखडा तयार केला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.  2022 च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान आवास योजनेसाठी 48,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे आणि 80 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असे पंतप्रधान म्हणाले.

A group of people in a meetingDescription automatically generated with medium confidence

वेबिनार दरम्यान, माननीय पंतप्रधानांनी परवडणाऱ्या घरांना चालना देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून देशभरातील सहा शहरांमध्ये पीएमएवाय (शहरी) अंतर्गत पथदर्शी प्रकल्पांच्या (लाईट हाऊस) बांधकामाविषयी देखील सांगितले.  देशाच्या शहरी आणि ग्रामीण भागात इतर परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी अशा बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे यावरही त्यांनी भर दिला.

वेबिनारमधील माननीय पंतप्रधानांच्या भाषणाचा संपूर्ण मजकूर वाचण्यासाठी, येथे क्लिक करा:

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1800489

पंतप्रधानांच्या उद्घाटनपर भाषणानंतर, अर्थसंकल्पावरील अंमलबजावणीच्या पथदर्शी आराखड्यावर कृतीबिंदू आणि रणनीती कशी आखायची  यावर तज्ञांशी चर्चा आणि विचारमंथन करण्यासाठी वेगवेगळ्या सत्रांचे नियोजन करण्यात आले.

‘सर्वांसाठी घरे’ या सत्रासाठी, ‘अमृतकालमध्ये सर्वांसाठी घरे साकारणे’ या उप-संकल्पनेवर आधारीत चर्चेचा विषय होता:

  1. परवडणाऱ्या घरांच्या सार्वत्रिक व्याप्ती सुलभ  करणे
  2. परवडणाऱ्या घरांची उपलब्धता वाढवण्यासाठी इतर योजना, शहरी नियोजन आणि पायाभूत सुविधांच्या धोरणांशी सांगड  
  3. परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात खाजगी सहभाग वाढवणे

आंध्र प्रदेशचे विशेष मुख्य सचिव (शहरी विकास आणि गृहनिर्माण), अजय जैन, यांनी घरांचे महत्त्व आणि ते माणसाचा आत्मविश्वास आणि विकास यात कसे भर घालते  हे अधोरेखित केले.  

Graphical user interfaceDescription automatically generated

क्रेडाईचे हर्षवर्धन पटोडिया, यांनी परवडणाऱ्या घरांमध्ये खाजगी सहभाग वाढवण्यावर मत मांडले.  ते म्हणाले की, माननीय पंतप्रधानांच्या ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेला पूरक म्हणून, अनेक क्रेडाई सदस्यांनी देशभरात परवडणारे गृहनिर्माण प्रकल्प सुरू केले आहेत.

शुभगतो दासगुप्ता, वरिष्ठ फेलो (सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च) यांनी परवडणाऱ्या घरांच्या सार्वत्रिक व्याप्तीबाबत विचार मांडले.

पीएमएवाय-ग्रामीणच्या बाजूने, विविध वक्ते आणि योजना भागधारकांसह राज्य सचिव आणि पीएमएवायजीच्या अंमलबजावणीत सहभागी असलेले ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ञ आणि नागरी समाजातील मान्यवर सदस्य सहभागी झाले.

झारखंडचे ग्रामीण विकास सचिव डॉ. मनीष रंजन यांनी “पंतप्रधानांच्या संकल्पनेचे वास्तवात रुपांतर करणे (झारखंडमध्ये पीएमएवाय-जीची प्रभावी अंमलबजावणी)” या विषयावर भाष्य केले. दिल्लीच्या स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चरचे व्हिजिटिंग प्रोफेसर आणि यूएनडीपीचे आंतरराष्ट्रीय सल्लागार, डॉ. पी के दास यांनी पीएमएवायजी अंतर्गत रोजगार निर्मिती, प्रशिक्षण, संरचना (डिझाइन), खर्च, हरित गृहनिर्माण आणि पर्यावरणीय पैलू यावर आपले विचार मांडले.

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी, यांनी समारोपाचे भाषण केले.  श्री जोशी यांनी अर्थसंकल्पीय घोषणा आणि शिफारशींवर भर दिला.

चर्चेचा सारांश देताना श्री जोशी यांनी एका घराच्या बांधकामामुळे 314 दिवसांचा रोजगार मिळतो यावर प्रकाश टाकला.

 

 

* * *

N.Chitale/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1800631) Visitor Counter : 134