आदिवासी विकास मंत्रालय

राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्था (एनटीआरआय) नवी दिल्ली आणि भारतीय आदिम जनजाती सेवा संघटना (बीएजेएसएस) यांच्यात बीएजेएसएस हे एनटीआरआयचे संसाधन केंद्र म्हणून स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार


नवी दिल्लीत झांडेवाला येथील बीएजेएसएसच्या इमारतीत आदिवासी संग्रहालय आणि आदिवासींवरील दुर्मिळ पुस्तकांचे संवर्धन आणि जतन

Posted On: 23 FEB 2022 3:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 फेब्रुवारी 2022

 

राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्था, नवी दिल्ली आणि भारतीय आदिम जनजाती सेवा संघटना (बीएजेएसएस) यांनी  एनटीआरआयचे संसाधन केंद्र म्हणून बीएजेएसएसला विकसित करण्यासाठी 21 फेब्रुवारी 2022 रोजी सामंजस्य करार केला.  यावेळी आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा उपस्थित होते. टिआरआय उत्तराखंडचे संचालक एस.एस. तोलिया यांनी एनटीआरआयच्या वतीने तर   भारतीय आदिम जनजाती सेवा संघटनेच्या (बीएजेएसएस) वतीने अध्यक्ष नयन चंद्र हेमब्रम यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

स्वातंत्र्यापासून अनेक मान्यवर बीएजेएसएसशी जोडले गेले आहेत. डॉ. राजेंद्र प्रसाद हे संस्थेचे पहिले अध्यक्ष होते असे अर्जुन मुंडा यांनी यावेळी सांगितले. बीएजेएसएसची स्थापना 1948 मध्ये श्री. ठक्कर बाप्पा यांनी केली. भारतातील आदिवासी समुदायांच्या सर्वसमावेशक आणि सर्वांगीण उन्नतीसाठी उल्लेखनीय योगदान देणारे ते महान समाजसेवक होते अशी माहिती त्यांनी दिली.

नवी दिल्लीतील  झंडेवाला येथील संस्थेच्या इमारतीत त्यांच्या ग्रंथालयात दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह आणि आदिवासी कलाकृती असलेले संग्रहालय आहे.  हा वारशाचे जतन, डागडुजी आणि देखभाल केली नसती तर तो नष्ट झाला  असता. 

देश स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत आहे, तेव्हा बीएजेएसएसला एनटीआरआयचे संसाधन केंद्र बनवले आहे. त्यामुळे विद्यार्थी, संशोधक आणि आदिवासी संस्कृती आणि इतिहासात रुची असलेले अभ्यागत दिल्लीत उपलब्ध असलेल्या सुविधांचा योग्य वापर करू शकतील आणि येणाऱ्या पिढ्याही समृद्ध सांस्कृतिक वारसा जाणून घेऊ शकतील. अधिकाऱ्यांच्या पथकासह घटनास्थळी भेट देऊन ऐरवी दुर्लक्षित राहिलेल्या पुस्तकांचे जतन आणि संग्रहालयाच्या जीर्णोद्धाराबद्दल माननीय मंत्र्यांचे, भारतीय आदिम जनजाती सेवा संघटनेचे (बीएजेएसएस)  अध्यक्ष नयन चंद्र हेमब्रम यांनी आभार मानले.

बीएजेएसएस ग्रंथालयातील दुर्मिळ पुस्तकांचे जतन आणि डिजिटायझेशन आणि ते ई-लायब्ररीमध्ये विकसित करण्यासाठी तसेच आदिवासी संग्रहालयाच्या सुधारणेसाठी, कलाकृतींचे डिजिटायझेशन आणि परस्परसंवादी मंचास एका अद्वितीय सांस्कृतिक वारशाच्या रुपात जतन करण्यासाठी, एकूण 150 लाख रुपयांचा निधी मंत्रालयाने मंजूर केला आहे.  


* * *

Jaydevi PS/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1800535) Visitor Counter : 205