जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘हर घर जल’ योजने अंतर्गत पाणी तसेच स्वच्छता यांच्यावर यावर्षीच्या केन्द्रीय अर्थसंकल्पाचा परिणाम या विषयावरील वेबिनारला संबोधित करणार


ब्रेक आउट सत्र: ग्रामीण पाणीपुरवठा आराखडा सशक्त करणे आणि वर्ष 2024 पर्यंत प्रत्येक घराला नळाने पाणीपुरवठा होईल याची सुनिश्चिती करणे

Posted On: 22 FEB 2022 9:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 फेब्रुवारी 2022

 

ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाने रोज दरडोई 55 लिटर स्वच्छ पाण्याचा पुरवठा करून आत्मनिर्भर भारत साकारण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून उद्या पाणी तसेच स्वच्छता या विषयांबाबत केंद्रीय अर्थसंकल्पाची अंमलबजावणी या विषयावर एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 23 फेब्रुवारी 2022 ला सकाळी 10 वाजता या वेबिनारला आभासी पद्धतीने संबोधित करतील.केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत, केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल आणि जलशक्ती राज्यमंत्री विश्वेश्वर तुडू यांच्यासह संयुक्त राष्ट्र  डब्ल्यूएएसएच मधील महत्त्वाचे भागधारक आणि तंत्रज्ञानविषयक तज्ञ या प्रसंगी त्यांचे विचार व्यक्त करतील.कार्यक्रमाशी संबंधित विविध भागधारकांशी चर्चा आणि विचारविनिमय करण्याच्या नव्या पद्धतीचा भाग म्हणून या वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. 

सकाळी 11 वाजता या क्षेत्रातील विद्वान व्यक्ती, खासगी क्षेत्रांतील प्रतिनिधी आणि अगदी तळागाळातील भागधारक यांच्यासोबत ब्रेकआउट सत्रांचे आयोजन केले जाईल. या सत्रात हे सर्वजण केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत तसेच ग्रामीण भागांमध्ये सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केल्यामुळे झालेले परिणाम यांच्याबद्दलची त्यांची मते व्यक्त करतील.

तज्ञ व्यक्तींखेरीज, या अभियानाद्वारे विविध भागधारकांना प्रशिक्षित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महत्त्वाच्या साधनसंपत्ती केंद्रातील व्यक्ती, जल जीवन अभियानाच्या अधिक उत्तम अंमलबजावणीसाठी त्यांच्या सूचना मांडतील. ते सर्वजण, प्रत्यक्ष कार्यस्थळावरील अनुभव, ज्येष्ठ अधिकाऱ्यांना विविध टप्प्यावर देण्यात आलेले प्रशिक्षण, मधल्या पातळीवर कार्यक्रम राबविणारे आणि अगदी तळाच्या पातळीवरील कार्यदल यांच्याबद्दल देखील माहिती देतील.

सामाजिक गुंतवणुकीसाठी पंचायत राज संस्थांशी भागीदारी करणे, ट्रान्ससेक्ट वॉकचे आयोजन करणे, पाणी समिती स्थापन करणे आणि ग्राम कृती योजना तयार करणे यासाठी राज्य सरकारांनी शहरी सामाजिक संस्थांना अंमलबजावणी आधार संस्था म्हणून नेमले आहे. या संस्थांचे सदस्य देखील या वेबिनारमध्ये त्यांनी केलेल्या प्रत्यक्ष कामाबद्दल माहिती देतील.

‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ या घोषणेचे अनुसरण करत, 100 जिल्हे, 1,144 ब्लॉक्स, 66,647 ग्राम पंचायती आणि 1,37,642 गावांनी ‘हर घर जल’ संकल्पना प्रत्यक्षात साकार केली आहे. 30 महिन्यांच्या थोडक्या कालावधीत देशाच्या ग्रामीण भागातील 9 कोटींहून घरांना नळजोडण्या मिळाल्या आहेत. गोवा, तेलंगणा आणि हरियाणा ही तीन राज्ये तसेच अंदमान-निकोबार द्वीपसमूह, दादरा-नगर हवेली आणि दमण आणि दीव तसेच पुद्दुचेरी या तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये 100% नागरिकांना नळाने पाणीपुरवठा होत आहे. इतर राज्ये देखील या दिशेने वेगाने प्रयत्न करत असून ती देखील लवकरच शंभर टक्के लक्ष्य गाठतील. यापैकी या वर्षी ‘हर घर जल’ योजनेचे पंजाबमध्ये 99%, हिमाचल प्रदेश मध्ये 93%,गुजरातमध्ये 92% तर बिहारमध्ये 90% उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.  


* * *

S.Patil/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1800409) Visitor Counter : 216