गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय अर्थसंकल्प 2022 च्या घोषणांच्या अंमलबजावणीसंदर्भात वेबिनारमध्ये माननीय पंतप्रधान करणार उद्घाटनपर भाषण


‘अमृतकाळात सर्वांसाठी घरे साकारणे’ या विषयावर मंत्रालयाचे अधिकारी/ग्रामीण आणि शहरी गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञ करतील चर्चा

Posted On: 22 FEB 2022 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 फेब्रुवारी 2022

 

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (एमओएचयूए) आणि ग्रामीण विकास मंत्रालयाने (एमओआरडी) इतर मंत्रालयांच्या सहकार्याने 23 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी उद्घाटनपर भाषण करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 मध्ये घोषित केलेल्या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी 'विकासाच्या प्रवाहात कोणताही नागरीक मागे राहाता कामा नये' यावर सरकारच्या वेबिनारच्या मालिकेचा हा कार्यक्रम एक भाग आहे.

TimelineDescription automatically generated

वेबिनारमध्ये सरकारी अधिकारी, विविध मंत्रालयांचे प्रतिनिधी, संस्था, सल्लागार, संबंधित क्षेत्रातील तज्ञ, बांधकाम विकासक  आणि इतर भागधारकांचा सहभाग असेल. यात ग्रामीण आणि शहरी विकासाशी संबंधित विविध क्षेत्रांवर आधारित वेगवेगळी सत्रे आयोजित केली जातील.

वेबिनारमध्ये, घोषणाविषयी  पावले उचलण्याबाबतचे मुद्दे कसे मांडायचे आणि अर्थसंकल्प अंमलबजावणी कृती आराखड्यावर रणनीती कशी आखायची यावर तज्ञांशी चर्चा आणि विचारमंथन करण्यासाठी सहा सत्रे नियोजित करण्यात आली आहेत.

TimelineDescription automatically generated

केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर करताना, अर्थमंत्री श्रीमती.  निर्मला सीतारामन यांनी शहरी गृहनिर्माणाचे महत्व आणि शहरीकरणाच्या वाढत्या वेगाची नोंद घेत अनेक घोषणा केल्या होत्या , त्याच्या अंमलबजावणीसंदर्भात या वेबिनार मध्ये चर्चा होणार आहे.

वेबिनारची सुरुवात सकाळी 11 वाजता होईल. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी, 'सर्वांसाठी घरे आणि अर्थसंकल्पीय घोषणा' यावर प्रास्ताविक करतील.  त्यानंतर, वक्ते/तज्ञ आपापली मते मांडतील.

प्रश्नोत्तरे आणि चर्चा यासह दोन तासांचे सत्र असेल.  सत्रासाठी नोंदणी करण्यासाठी, यावर क्लिक करा.

https://pmayu.webex.com/pmayu/j.php?RGID=r7fcea2cedbeb286316ae7eed8f1b12d7.

 

वेबिनारचा उद्देश (अजेंडा) खालीलप्रमाणे आहे:

Time

 

 

 

Sub-Themes

 

Speaker/Moderators

 

11:00 am - 11:10 am

 

 

Introduction to Housing for All and Budget Announcements

Shri Manoj Joshi, Secretary (MoHUA)

11: 10 am - 11:25 am

Convergence with other schemes, urban planning and infrastructure strategies for enhancing delivery of affordable housing

 

Shri Ajay Jain, Special Chief Secretary (Housing), Government of Andhra Pradesh

 

11: 25 am - 11:40 am

 

 

Enhancing private participation in affordable housing sector

Shri Harsh Vardhan Patodia, President, CREDAI

11:40 am - 11:55 am

 

 

Facilitating universal coverage of affordable housing

Shri Shubhagato Dasgupta, Senior Fellow, CPR

 

11:55 am - 12:10 pm

 

 

Employment generation, training, design, cost, green housing and environmental aspect under PMAY-G

Dr. PK Dash, Visiting Professor, School of Planning and Architecture & International Consultant, UNDP

12:10 pm - 12:25 pm

Demo Houses in Uttar Pradesh and Assam

 

Shri SK Negi, CBRI

 

12:25 pm - 12:40 pm

 

 

Translating Hon’ble Prime Minister's Vision into Reality (Effective Implementation of PMAY-G in Jharkhand)

 

Dr. Manish Ranjan, Secretary (RD), Government of Jharkhand

12: 40 pm - 12:55 pm

 

Questions & Answers and Discussions

12:55 pm- 1:00 pm

Closing Remarks by Shri Manoj Joshi, Secretary (MoHUA) and Shri Prashant Kumar, Former Special Secretary (MoRD)

 

 

 

* * *

Jaydevi PS/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1800345) Visitor Counter : 248