Posted On:
21 FEB 2022 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी 2022
15 व्या वित्त आयोगाच्या संसाधनाव्यतिरिक्त “सीमा भागात पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापन” (BIM) ची केंद्रीय एकछत्री योजना 2021-22 ते 2025-26 या काळात 13,020 कोटी रुपये खर्चासह पुढे सुरु ठेवण्यासाठी मोदी सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मंत्रालय सीमेवरील पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी वचनबद्ध आहे. या निर्णयामुळे सीमा व्यवस्थापन, गस्त आणि सीमेचे रक्षण करण्यासाठी तिथल्या पायाभूत सुविधांना बळ मिळेल.
ही योजना भारत-पाकिस्तान, भारत-बांगलादेश , भारत-चीन, भारत-नेपाळ, भारत-भूतान आणि भारत-म्यानमार सीमा सुरक्षित राखण्यासाठी सीमेवर कुंपण, प्रकाशझोत, तंत्रज्ञान विषयक संशोधन , सीमा रस्ते आणि बॉर्डर आउटपोस्ट (BOPs)/कंपनी ऑपरेटिंग बेस (COBs) यासारख्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये मदत करेल.
* * *
R.Aghor/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com