सांस्कृतिक मंत्रालय

आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जाणार

Posted On: 20 FEB 2022 4:37PM by PIB Mumbai

 

आझादी का अमृत महोत्सवा अंतर्गत,भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय,आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करणार असून  त्यानिमित्त, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्ली येथे 21 ते 22 फेब्रुवारी 2022 या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि बहुभाषकतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 21 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून  जगभरात साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 2022चीयंदाची संकल्पना : बहुभाषिक शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर: आव्हाने आणि संधी, ही असून बहुभाषिक शिक्षणात प्रगती साधण्यासाठी आणि सर्वांसाठी दर्जेदार अध्यापन आणि शिक्षणाच्या विकासाला बळ देण्यासाठी तंत्रज्ञानाची संभाव्य भूमिका यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

हा दिवस साजरा करण्यासाठी, सांस्कृतिक मंत्रालय, इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स (IGNCA) आणि युनेस्कोच्या नवी दिल्ली येथील विभागीय कार्यालयाच्या सहयोगाने प्रत्यक्ष आणि आभासी स्वरूपात दोन दिवसीय कार्यक्रमांचे  आयोजन करत आहे.

'एकम भारतम' या कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री श्रीमती मा.  मीनाक्षी लेखी 'वंदे भारतम' साउंडट्रॅकचे औपचारिक प्रकाशन करणार आहेत.  तबलावादक बिक्रम घोष यांच्यासह ग्रॅमी पुरस्कार विजेते रिकी केज यांनी सह-निर्मित केलेले हे गीत  2022 च्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सांस्कृतिक मंत्रालयाच्या नृत्य सादरीकरणाचा एक  भाग म्हणून सादर झाले होते.

***

N.Chitale/S.Shaikh/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1799830) Visitor Counter : 361