माहिती आणि प्रसारण मंत्रालय
नौदल ताफ्याच्या कवायतींचे दूरदर्शनवर थेट प्रसारण
Posted On:
20 FEB 2022 11:05AM by PIB Mumbai
राष्ट्रपतींच्या उपस्थितीत 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारतीय नौदलाच्या ताफ्याच्या सोहळ्याचे (फ्लीट रिव्हूय) सर्वात आव्हानात्मक थेट प्रसारण करण्यासाठी दूरदर्शनने अनेक नवनवीन संकल्पना समोर आणल्या आहेत.
राष्ट्रपती राम नाथ कोविंद 21 फेब्रुवारी 2022 रोजी विशाखापट्टणम येथे एका औपचारिक कार्यक्रमात भारतीय नौदलाच्या ताफ्याचा आढावा घेणार आहेत. या कार्यक्रमात भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय व्यापारी नौदल समूहातील जहाजांसह नौदलाच्या जवळपास 60 जहाजांचा सहभाग असेल. 'भारतीय नौदल - राष्ट्रसेवेची 75 वर्षे' या संकल्पनेवर आधारीत स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या निमित्ताने नौदल, अमृतस्मरण देखील यातून प्रदर्शित केले जाणार आहे.
या वर्षीच्या प्रेसिडेन्शिअल फ्लीट रिव्ह्यूचे दूरदर्शनचे थेट प्रसारण करताना विविध प्रकाराने दूरदर्शन आपल्या उपक्रमांचे प्रथमच दर्शन घडवणार आहे, कारण त्यात जमीन आणि समुद्रावरून सुव्यवस्थित प्रसारण करण्यासाठी वापरल्या जाणार्या विशेष लेन्सच्या ड्रोनसह किमान 30 कॅमेर्यांचा समावेश असेल आणि जमिनीवर आणि पाण्यावर या बहु-कॅमेर्यांनी अविरतपणे प्रसारण सुनिश्चित केले जाईल.
फ्लीट रिव्ह्यूच्या विविध घटकांमध्ये अँकरेज, मोबाईल कॉलममधील स्टीम पास्ट, फ्लाय पास्ट आणि जहाजांच्या कवायती, जहाजांच्या मोठ्या स्तंभांची विविध रचना इत्यादींचा समावेश आहे. हे सर्व जमिनीवर आणि समुद्रावर तैनात केलेल्या दूरदर्शनच्या कॅमेऱ्यांद्वारे टिपले जाईल.
ऑक्टोबर 2021 पासून दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ या भव्य कार्यक्रमाच्या प्रसारणाची तयारी करत आहेत. त्यांच्या समूहाने जमीन आणि समुद्रावर कॅमेरे तैनात करण्यापूर्वी स्थळाचे विस्तृत सर्वेक्षण केले आहे, स्थळाभोवती व्यापक फेरफटका मारला आहे.
हे प्रसारण दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.30 पासून डीडी नॅशनल, डीडी न्यूज, डीडी इंडिया आणि डीडीच्या अनेक प्रादेशिक चॅनेलवर जवळजवळ 3 तास चालणारे अखंडित थेट प्रसारित केले जाईल,ते कार्यक्रमाची सांगता होईपर्यंत सुरू राहील. संपूर्ण प्रसारण दूरदर्शनच्या यूट्यूब वाहिनीवर देखील थेट उपलब्ध असेल.
***
ST/SS/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1799795)
Visitor Counter : 268