पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली देशभरातील प्रमुख शीख नेत्यांची भेट


चार साहिबजादे यांच्या सन्मानार्थ, त्यांचा बलिदान दिन ‘वीर बाल दिवस’ जाहीर केल्याबद्दल शीख समुदायाकडून पंतप्रधानांना धन्यवाद

वीर बाल दिवसामुळे देशभरातील मुलांना चार साहिबजादे यांच्या बलिदानाची आणि योगदानांची जाणीव होईल: पंतप्रधान

शीख समुदायाच्या सेवाभावी वृत्तीची पंतप्रधानांनी केली प्रशंसा; जगाला याविषयी अधिक माहिती होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन

आमचे सरकार शीख समुदायाच्या कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध: पंतप्रधान

शीख समुदायाच्या कल्याणासाठी सातत्याने उचललेल्या पावलांबद्दल प्रतिनिधीमंडळाने मानले पंतप्रधानांचे आभार, त्यांच्या या प्रयत्नांतून ते मनानी शीखच असल्याचे दिसत असल्याच्या भावना व्यक्त

Posted On: 18 FEB 2022 8:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 फेब्रुवारी 2022


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे निवासस्थान, सात, लोककल्याण मार्ग इथे देशभरातल्या प्रमुख शीख नेत्यांच्या प्रतिनिधीमंडळाची भेट घेतली. शीख समुदायाच्या कल्याणासाठी पंतप्रधानांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांबद्दल, या प्रतिनिधीमंडळाने त्यांचे आभार मानले. विशेषतः चार साहिबजादे यांनी दिलेल्या बलिदानाच्या सन्मानार्थ, त्यांचा बलिदान दिवस, 26 डिसेंबर हा दिन ‘वीर बाल दिवस’ म्हणून जाहीर करण्याच्या त्यांच्या निर्णयाबद्दल, या नेत्यांनी आभार मानले. यावेळी मंडळातील प्रत्येक सदस्याने, त्यांना’सिरोपांव’(पगडी) आणि ‘सिरी साहिब’ (कृपाण) देऊन त्यांचा सत्कार केला.

देशातील अनेक राज्यातल्या लोकांना चार साहिबजादे यांनी धर्म आणि देशरक्षणासाठी दिलेल्या योगदानाची आणि त्यांच्या बलिदानाची माहिती नाही, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. जेव्हा जेव्हा आपल्याला शाळांमध्ये किंवा मुलांसामोर बोलण्याची संधी मिळते, त्यावेळी ते नेहमीच चार साहिबजादे यांच्याविषयी सांगतात, असे ते पुढे म्हणाले. 26 डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिन’ म्हणून साजरा करण्याच्या निर्णयामुळे,देशभरातील मुलांना त्यांच्याविषयी माहिती मिळेल, त्यांच्या बलिदानाची जाणीव होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

त्यांना भेटायला आल्याबद्दल पंतप्रधानांनी शीख समाजाच्या नेत्यांचे आभार मानले ‘आपल्या घराचे दरवाजे त्यांच्यासाठी नेहमीच उघडे असतील’ अशी ग्वाही त्यांनी दिली. पंजाबमध्ये असताना त्यांच्यासोबत वेळ घालवला होता आणि राहिले होते त्या आठवणींना पंतप्रधानांनी उजाळा दिला. 

शीख समाजाच्या सेवाभावी वृत्तीची पंतप्रधानांनी प्रशंसा केली आणि म्हणले की,  याविषयी  जगातील अधिकाधिक लोकांना माहिती दिली पाहिजे. पंतप्रधान म्हणाले, त्यांचे सरकार शीख समुदायाच्या कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. या दिशेने सरकारने उचललेल्या अनेक पावलांविषयी पंतप्रधानांनी माहिती दिली. गुरु ग्रंथ साहिब अफगाणिस्तानातून संपूर्ण सन्मानाने परत आणण्यासाठी केलेल्या विशेष व्यवस्थेची त्यांनी चर्चा केली. शीख भाविक आणि यात्रेकरूंसाठी कर्तारपूर मार्गिका उघडण्यासाठी सरकारने मुत्सद्देगिरीने टाकलेल्या पावलांविषयी देखील पंतप्रधान बोलले.

मंजिंदर सिंग सिरसा म्हणाले की,  वीर बाल दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने देशभरातील मुलांना चार साहिबजाद्यांनी जो त्याग केला त्याबद्दल माहिती मिळेल. सिंग साहिब ग्यानी रणजीत सिंग, जत्थेदार तख्त श्री पटना साहिब यांनी कर्तारपूर मार्गिका पुन्हा उघडण्यासाठी पावले उचलल्याबद्दल आणि लंगर वरील वस्तू आणि सेवा कर माफ केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. ते म्हणले की,  शीख समुदायासाठी पंतप्रधानांनी उचललेल्या अनेक पावलांकडे बघता असे लक्षत येते की ते मानाने शीख आहेत. राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष तरलोचन सिंग म्हणले, स्वातंत्र्यानंतर प्रथमच शीख समुदायाच्या योगदानाची दाखल घेतली गेली आहे. फाळणीच्या वेळी मोठ्या संख्येने शीख लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. शीख समुदायाचे योगदान जागतिक मंचावर घेऊन गेल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.


* * *

S.Bedekar/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1799398) Visitor Counter : 223