PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 17 FEB 2022 7:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 17 फेब्रुवारी 2022

  • 174.24 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 3,32,918
  • Active cases stand at 0.78%
  • Recovery Rate currently at 98.03%
  • 67,538 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,19,10,984
  • 30,757 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (2.61%)
  • Weekly Positivity Rate (3.04%)
  • 75.55 cr Total Tests conducted so far; 11,79,705 tests conducted in the last 24 hours

  #Unite2FightCorona                                                                                    #IndiaFightsCorona

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार, गेल्या 24 तासांत लसीच्या 34.75 लाखांहून अधिक (34,75,951) मात्रा देऊन भारतातील कोविड-19  प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 174.24  कोटी (1,74,24,36,288) मात्रांचा टप्पा पार केला आहे.

गेल्या 24 तासात 67,538 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून) 4,19,10,984 झाली आहे.

परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा दर 98.03% इतका आहे.

गेल्या 24 तासात 30,757 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 3,32,918 आहे. देशात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.78% आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे. गेल्या 24 तासात एकूण 11,79,705 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 75.55 कोटींपेक्षा जास्त (75,55,32,460) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.04% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील 2.61% नोंदविण्यात आला आहे.

इतर अपडेट्स :

 

 

 

 S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1799128) Visitor Counter : 228