आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 174.24 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


गेल्या 24 तासात लसीच्या 34.75 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.03%

गेल्या 24 तासात 30,757 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 3,32,918

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.04%

Posted On: 17 FEB 2022 9:25AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार, गेल्या 24 तासांत लसीच्या 34.75 लाखांहून अधिक (34,75,951) मात्रा देऊन भारतातील कोविड-19  प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 174.24  कोटी (1,74,24,36,288) मात्रांचा टप्पा पार केला आहे.

1,96,65,024 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,00,159

2nd Dose

99,43,533

Precaution Dose

39,73,202

FLWs

1st Dose

1,84,06,721

2nd Dose

1,73,99,323

Precaution Dose

56,45,765

Age Group 15-18 years

1st Dose

5,29,34,308

2nd Dose

1,85,46,964

Age Group 18-44 years

1st Dose

54,93,92,751

2nd Dose

43,13,46,193

Age Group 45-59 years

1st Dose

20,18,76,954

2nd Dose

17,73,80,069

Over 60 years

1st Dose

12,60,75,411

2nd Dose

11,05,08,628

Precaution Dose

86,06,307

Precaution Dose

1,82,25,274

Total

1,74,24,36,288

 

 

 


गेल्या 24 तासात 67,538 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून) 4,19,10,984 झाली आहे.

परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा दर 98.03% इतका आहे.



गेल्या 24 तासात 30,757 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली


 

भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 3,32,918 आहे. देशात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.78% आहे.



देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे. गेल्या 24 तासात एकूण 11,79,705 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 75.55 कोटींपेक्षा जास्त (75,55,32,460) चाचण्या केल्या आहेत.

 

देशभरात चाचणी क्षमता वाढवली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.04% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील 2.61% नोंदविण्यात आला आहे.


***

ST/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1798989) Visitor Counter : 243