अर्थ मंत्रालय
प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर 29.8 लाखांहून अधिक प्रमुख कर लेखापरीक्षण अहवाल (टीएआर) दाखल
Posted On:
16 FEB 2022 6:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2022
प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत 29.8 लाखांहून अधिक प्रमुख कर लेखापरीक्षण अहवाल (टीएआर) दाखल करण्यात आले आहेत. अखेरच्या दिवशी, 4.14 लाखांहून अधिक प्रमुख कर लेखापरीक्षण अहवाल/अर्ज दाखल करण्यात आले.
आर्थिक वर्ष 21-22 मध्ये 29.8 लाख प्रमुख वैधानिक अर्जांपैकी 2.65 लाख 3सीए-3 सीडी अर्ज आणि सुमारे 24.5 लाख 3 सीबी -3सीडी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. 15.02.2022 पर्यंत 2.71 लाखांहून अधिक इतर कर लेखापरीक्षण अहवाल (अर्ज 10बी, 29बी, 29सी, 3सीईबी, 10सीसीबी, 10 बीबी ) दाखल करण्यात आले आहेत.
15.02.2022 रोजी, 34,842 अर्ज सीए -3सीडी (एकूण 2,65,153 अर्जांपैकी ), 3,36,842 अर्ज 3सीबी -3सीडी (एकूण 24,48,950 अर्जांपैकी), 18,644 अर्ज 10बी (एकूण 1,50,950 अर्जांपैकी), 11,852 अर्ज 29 बी (एकूण 74,923 अर्जांपैकी), 478 अर्ज 29सी (एकूण 2,820 अर्जांपैकी), 10,542 अर्ज 3सीईबी (एकूण 33,345 अर्जांपैकी),अर्ज 10 सीसीबी मधील 873 (एकूण 4,904 अर्जांपैकी) आणि 10बीबीमधील अर्ज 570 (एकूण 3851 अर्जांपैकी) दाखल करण्यात आले आहेत. शेवटच्या तारखेला म्हणजे 15.02.2022 या मुदत वाढवून दिलेल्या देय तारखेला, या वैधानिक अर्जांपैकी 14% आणि 11.02.2022 ते 15.02.2022 या शेवटच्या 5 दिवसात, 30% वैधानिक अर्ज भरण्यात आले.
निर्धारण वर्ष 2021-22 साठी दाखल केलेल्या 6.26 कोटी प्राप्तिकर विवरणपत्रांपैकी 5.41 कोटी पेक्षा जास्त प्राप्तिकर विवरणपत्रे (आयटीआर ) सत्यापित करण्यात आली आहेत. सत्यापित प्राप्तिकर विवरणपत्रांपैकी, 4.50 कोटींपेक्षा पेक्षा जास्त प्राप्तिकर विवरणपत्रांसंदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाली आणि निर्धारण वर्ष 2021-22 साठी 1.58 कोटी रुपये परताव्याच्या स्वरूपात वितरीत करण्यात आले आहेत.
सर्व कर व्यावसायिक आणि करदात्यांनी अनुपालनासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल प्राप्तिकर विभागाने कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि अहवाल सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या अनुषंगाने, ज्या करदात्यांनी त्यांच्या सनदी लेखापालाने सादर केलेला कर लेखापरीक्षण अहवाल अद्याप स्वीकारलेला नाही त्या करदात्यांनी याकडे लक्ष देण्याची विनंती विभागाने केली आहे.
* * *
S.Tupe/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1798837)
Visitor Counter : 221