आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 172 कोटी 95 लाखांहून अधिक मात्रा देण्याचे काम पूर्ण
गेल्या 24 तासात कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 11 लाख 66 हजारांहून अधिक मात्रा देण्यात आल्या
देशातील रोगमुक्ती दर सध्या 97.68%
गेल्या 24 तासात देशात 34,113 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद
भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 4,78,882
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 3.99% आहे
Posted On:
14 FEB 2022 9:24AM by PIB Mumbai
गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 11 लाख 66 हजारांहून अधिक (11,66,993) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 172 कोटी 95 लाखांचा (1,72,95,87,490) टप्पा ओलांडला आहे.
देशभरात 1,93,87,689 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे
Cumulative Vaccine Dose Coverage
|
HCWs
|
1st Dose
|
1,03,99,496
|
2nd Dose
|
99,32,762
|
Precaution Dose
|
38,86,601
|
FLWs
|
1st Dose
|
1,84,05,359
|
2nd Dose
|
1,73,79,327
|
Precaution Dose
|
54,08,921
|
Age Group 15-18 years
|
1st Dose
|
5,21,32,053
|
2nd Dose
|
1,50,14,801
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
54,82,43,614
|
2nd Dose
|
42,68,53,644
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
20,16,66,665
|
2nd Dose
|
17,64,04,564
|
Over 60 years
|
1st Dose
|
12,59,18,631
|
2nd Dose
|
10,99,07,449
|
Precaution Dose
|
80,33,603
|
Precaution Dose
|
1,73,29,125
|
Total
|
1,72,95,87,490
|
गेल्या 24 तासांत 91,930 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात (महामारीच्या सुरवातीपासून) सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,16,77,641 झाली आहे.
परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 97.68% झाला आहे.
गेल्या 24 तासांत, देशात 34,113 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.
भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 4,78,882 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 1.12% आहे.
कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेच्या विस्ताराचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 10,67,908 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 75 कोटी 18 लाखांहून अधिक (75,18,03,766) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 3.99% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 3.19%.इतका आहे.
***
Jaydevi PS/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1798222)
Visitor Counter : 276
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam