पंतप्रधान कार्यालय
वन ओशन समिट या महासागर विषयक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
Posted On:
11 FEB 2022 9:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2022
अध्यक्ष मॅक्रॉन,
महामहीम,
नमस्कार!
महासागरांसाठीच्या या महत्त्वाच्या जागतिक उपक्रमाबद्दल मी अध्यक्ष मॅक्रॉन यांचे अभिनंदन करतो.
भारताला सागरी संस्कृतीची परंपरा आहे.
आमचे प्राचीन धर्मग्रंथ आणि साहित्य सागरी जीवनासह महासागरातील संपत्तीविषयी माहिती देतात.
आज आपली सुरक्षा आणि समृद्धी महासागरांशी निगडित आहे.
भारताच्या ''हिंद -प्रशांत महासागर उपक्रमांमध्ये ''मध्ये प्रमुख आधारस्तंभ म्हणून सागरी संसाधने आहेत.
भारत "राष्ट्रीय अधिकारक्षेत्राच्या पलीकडे जैव-विविधतेवर उच्च महत्वाकांक्षा आघाडी" या फ्रेंच उपक्रमाला पाठिंबा देतो.
आम्हाला या वर्षी कायद्याने बंधनकारक आंतरराष्ट्रीय कराराची आशा आहे.
एकाच वापराच्या प्लास्टिकचे उच्चाटन करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.
भारताने अलीकडेच किनारी भागातील प्लास्टिक आणि इतर कचरा स्वच्छ करण्यासाठी देशव्यापी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
तीन लाख तरुणांनी जवळपास 13 टन प्लास्टिक कचरा गोळा केला.
मी आमच्या नौदलाला या वर्षी समुद्रातील प्लास्टिक कचरा साफ करण्यासाठी 100 शिप-डे योगदान देण्याचे निर्देश दिले आहेत.
एकाच वापराच्या प्लॅस्टिकवर जागतिक उपक्रम सुरू करण्यात फ्रान्ससोबत सहभागी व्हायला भारत उत्सुक असेल.
धन्यवाद, अध्यक्ष मॅक्रॉन.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1797818)
Visitor Counter : 270
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam