आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 171 कोटी 79 लाखांहून अधिक मात्रा देण्याचे काम पूर्ण


गेल्या 24 तासांत, कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 48 लाख 18 हजारांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

देशातील रोगमुक्ती दर सध्या 97.17%

गेल्या 24 तासांत देशात 58,077 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 6,97,802

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 5.76% आहे

Posted On: 11 FEB 2022 9:43AM by PIB Mumbai

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 48 लाख 18 हजारांहून अधिक  (48,18,867) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 171 कोटी 79 लाखांचा (1,71,79,51,432)   टप्पा ओलांडला आहे.

 

देशभरात 1,91,96,734 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,03,98,922

2nd Dose

99,21,243

Precaution Dose

38,09,239

FLWs

1st Dose

1,84,04,139

2nd Dose

1,73,56,693

Precaution Dose

51,50,607

Age Group 15-18 years

1st Dose

5,13,17,677

2nd Dose

1,20,51,032

Age Group 18-44 years

1st Dose

54,70,41,238

2nd Dose

42,29,50,695

Age Group 45-59 years

1st Dose

20,14,14,698

2nd Dose

17,55,24,406

Over 60 years

1st Dose

12,57,25,893

2nd Dose

10,93,53,037

Precaution Dose

75,31,913

Precaution Dose

1,64,91,759

Total

1,71,79,51,432

 

 

गेल्या 24 तासांत 1,50,407  रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात (महामारीच्या सुरवातीपासून)  सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,13,31,158 झाली आहे.

 

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 97.17% झाला आहे.

 

गेल्या 24 तासांत, देशात 58,077 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

 

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 6,97,802 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 1.64% आहे.

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेच्या विस्ताराचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 14,91,678 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 74 कोटी 78 लाखांहून अधिक (74,78,70,047) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 5.76% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 3.89%.इतका आहे.

****

Jaydevi PS/ Sampada 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1797494) Visitor Counter : 196