नौवहन मंत्रालय

पीएम गति शक्ती राष्ट्रीय योजनेंतर्गत प्रमुख बंदरे आणि भारतीय देशांतर्गत जलमार्ग प्राधिकरणाच्या व्यवसाय सुलभता उपाय आणि तंत्रज्ञानाद्वारे (ओईटीटी) कार्यान्वयन कार्यक्षमतेचा सर्बानंद सोनोवाल यांनी घेतला आढावा

Posted On: 09 FEB 2022 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 फेब्रुवारी 2022

 

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री   सर्बानंद सोनोवाल यांनी आज पीएम  गति शक्ती राष्ट्रीय योजनेअंतर्गत विकासाला चालना देण्यासाठी, व्यवसाय सुलभता आणि तंत्रज्ञानाद्वारे कार्यान्वयन कार्यक्षमता (ओईटीटी) सुकर करण्यासाठी, विविध बंदरांनी हाती घेतलेल्या उपक्रमांचा व्यापक आढावा घेतला. केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर आणि सर्व प्रमुख बंदरांचे अध्यक्ष, भारतीय देशांतर्गत  जलमार्ग प्राधिकरणाचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पीएम गति शक्ती राष्ट्रीय योजना ही विकासाच्या सात इंजिनांवर आधारित असून बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय या  राष्ट्रीय बृहत योजनेच्या अंमलबजावणीत मोठी भूमिका बजावणार आहे, विना अडथळा संपर्कसुविधा, आर्थिक विकास आणि नागरिकांना सुशासन प्रदान करण्यासाठी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी  मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी बृहत योजनेची सुरुवात केली आहे.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले, “बंदरे आणि इतरांकडून करण्यात येत असलेल्या  एकात्मिक प्रयत्नांमुळे देशभरातील विकास कामांना गती मिळेल. पीएम गति शक्ती योजना लोकांना, शेतकरी, मासेमारी समुदायाला साहाय्यकारी ठरेल आणि भारताची अर्थव्यवस्था बळकट  करेल.

केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी सांगितले की, "पीएम गती शक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय वचनबद्ध आहे आणि आजची बैठक त्या दिशेने एक पाऊल आहे."


* * *

S.Thakur/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1796935) Visitor Counter : 175