सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन

Posted On: 09 FEB 2022 5:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 फेब्रुवारी 2022

 

देशाला सहकाराचा समृद्ध  वारसा असून  सहकार क्षेत्र बळकट आहे. देशात  राज्य सहकारी संस्था आणि बहु-राज्य सहकारी संस्था यांसारख्या दोन प्रकारच्या  सहकारी संरचना आहेत. केवळ एका राज्यात कार्यरत असलेल्या सहकारी संस्था संबंधित राज्य सरकारच्या कायद्यांद्वारे प्रशासित असतात आणि एकापेक्षा जास्त राज्यात कार्यरत असलेल्या सहकारी संस्था केंद्रीय कायद्याद्वारे म्हणजेच ,'बहु-राज्य सहकारी संस्था अधिनियम, 2002 ( 2002 चा 39 कायदा ) प्रशासित असतात. या संस्थांच्या  प्रशासनाशी संबंधित कोणत्याही समस्या संबंधित स्तरावर हाताळल्या जातात. मात्र देशातील सहकार क्षेत्राला नवीन आयाम देण्यासाठी तसेच  धोरण आणि इतर हस्तक्षेपांद्वारे  सहकार क्षेत्र अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने, देशातील सहकार चळवळ बळकट  करण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय, कायदेशीर आणि धोरणात्मक चौकट उपलब्ध करून देत  सरकारने नवीन सहकार मंत्रालयाची निर्मिती केली आहे.

2018 च्या नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया (एनसीयुआय) सांख्यिकीय अहवालानुसार, देशात 8.54 लाख सहकारी संस्था आहेत. इतर गोष्टींसोबत सहकारी संस्थांमध्ये प्रभावी प्रशासनाचा, नेतृत्व आणि व्यावसायिक व्यवस्थापनाचा अभाव, कमी प्रमाणात तंत्रज्ञानाचा अवलंब या गोष्टी सहकारी संस्थांच्या वेगवान आणि न्याय्य वाढीवर परिणाम करणाऱ्या आहेत.

तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणारी खरी लोक-आधारित चळवळ म्हणून सहकारी संस्थांचे प्रशासन अधिक सखोल करण्याच्या उद्देशाने, नवीन राष्ट्रीय सहकार धोरण आणि योजनांचा मसुदा  तयार केला  जात आहे आणि 'मेक इन इंडिया'वर लक्ष केंद्रित करण्यासह सहकार आधारित अर्थव्यवस्थेचे मॉडेल विकसित केले जात आहे. यामुळे सहकारातील सर्व विकासात्मक समस्या सोडविल्या जातील.केंद्र सरकारच्या मंत्रालयांसह संबंधितांकडून  माहिती /सूचना मागवल्या आहेत.

सहकारी संस्थांना अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनवण्यासाठी, मंत्रालयाने, सहकारी संस्थांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करणे, सुमारे 63000 सक्रिय प्राथमिक कृषी पतसंस्थांचे (पीएसीएस) डिजिटलीकरण यांसारख्या संबंधित उपक्रमांवर हितसंबंधितांशी  सल्लामसलत सुरू केली आहे.

सहकार मंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

Jaydevi PS/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1796898) Visitor Counter : 526