ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऊर्जामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पावर फाउंडेशनची बैठक

Posted On: 09 FEB 2022 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 फेब्रुवारी 2022 

 

केंद्रीय उर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा  मंत्री आर के सिंह यांच्या अध्यक्षतेखाली  काल पॉवर फाऊंडेशनसोबत आभासी माध्यमातून  बैठक झाली. या बैठकीला ऊर्जा सचिव अलोक कुमार, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे  सचिव इंदू शेखर चतुर्वेदी यांच्यासह ऊर्जा क्षेत्रातील  सार्वजनिक उपक्रमांचे मुख्य व्यवस्थापकीय संचालकदेखील उपस्थित होते.या बैठकीत पॉवर फाऊंडेशनची उद्दिष्टे, संशोधन आणि विकास यासंदर्भातील कार्यान्वयन धोरण, धोरण पुरस्कार आणि संप्रेषण धोरण यावर चर्चा करण्यात आली.

भारताचा ऊर्जा संक्रमण प्रवास सुलभ करण्यासाठी पुरावा  आधारित संशोधन अभ्यास आयोजित करण्यासाठी  आणि ई-वाहतूक आणि इलेक्ट्रिक साधनांद्वारे स्वयंपाक करण्यासाठी   ग्राहकांमध्ये  जागरूकता वाढवण्यासाठी पॉवर फाउंडेशनचा फायदा करून घेण्याचे निर्देश मंत्री सिंह यांनी सर्व अधिकाऱ्यांना  दिले. मंत्र्यांनी  खालील बाबींवर अभ्यास करण्याची सूचना पॉवर फाऊंडेशनला केली:

  • भारतातील जलविद्युत विकासाला गती देणे.
  • भारतात वि- कार्बनीकरणासाठी  धोरणात्मक मार्गदर्शक आराखडा  विकसित करणे.
  • पर्यावरण नियमांची पूर्तता करण्यासाठी पर्याय म्हणून एफजीडी  तंत्रज्ञानाची देवाणघेवाण
  • नवीकरणीय ऊर्जेचे  मोठ्या प्रमाणात एकत्रीकरण.
  • देशासाठी ऊर्जा संक्रमणाचा  अल्पकालीन, मध्यम मुदतीचा  आणि दीर्घकालीन मार्गदर्शक आराखडा
  • इतर सुचविलेले संशोधन अभ्यास स्वीकारले  जातील:
  • भारतातील  वीज वितरण कंपन्यांच्या (डिस्कॉम्स)  वीज खरेदी खर्चाचा  आढावा आणि सर्वोत्तमीकरण.
  • 500 गिगावॅट  विना -जीवाश्म इंधन-आधारित क्षमतेसाठी ;  बाजारकारकत्व  संबंधित गोष्टींसाठी गुंतवणूक आवश्यक 
  • ग्रिड-स्केल स्टोरेज, एनर्जी स्टोरेज (बॅटरी स्टोरेज आणि इतर पर्याय).
  • हायड्रोजन अर्थव्यवस्था : भारतासमोरील पर्याय.

भारताच्या जी 20 अध्यक्षपदासाठी आणि स्वच्छ ऊर्जा मंत्रालयासाठी  पॉवर फाउंडेशन ऊर्जा मंत्रालयाला ज्ञान भागीदार  म्हणून मदत करणार आहे.

पॉवर फाउंडेशन बद्दल:

पॉवर फाऊंडेशन ही एक नोंदणीकृत संस्था आहे . ऊर्जा आणि संबंधित क्षेत्रांवरील राष्ट्रीय संवादांमध्ये सहभागी असणारी, राज्यांना सहाय्य्य करण्यासाठी अधिकृत विश्लेषण, माहिती  धोरण शिफारसी आणि वास्तविक-जगातील उपाय प्रदान करणारी ,धोरण सल्ला देण्याचे  उद्दिष्ट असलेली अग्रगण्य संस्था आहे.


 

* * *

Jaydevi PS/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1796891) अभ्यागत कक्ष : 228