रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
वाहनांसाठी इंधन म्हणून हायड्रोजनचा वापर
Posted On:
09 FEB 2022 4:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2022
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिनांक 16 सप्टेंबर 2016 रोजी देशात वाहनांसाठी इंधन म्हणून हायड्रोजनचा वापर करण्यासंदर्भात जी.एस.आर. 889(ई) ही अधिसूचना काढली होती. या अंतर्गत ज्वलन इंजिनबाबत हायड्रोजनची वैशिष्ट्ये उक्त अधिसूचनेच्या परिशिष्ट आयव्ही-डब्लू मध्ये निर्दिष्ट केली आहेत. यात सीएजीसह हायड्रोजनचे 18% इतके मिश्रण सांगितले आहे.
मंत्रालयाने दिनांक 25 सप्टेंबर 2020 रोजी (एचसीएनजी) जी.एस.आर द्वारे 585(ई) अधिसूचित केले आहे. या मंत्रालयाने 23 सप्टेंबर 2020 रोजी, जी.एस.आर 579(ई) नुसार हायड्रोजन इंधन असलेली वाहने आणि त्यातील घटकांबाबत सुरक्षा नियम अधिसूचित केले आहेत.
हायड्रोजन आधारित वाहतूक आणि इंधन सेल विकासासह अक्षय उर्जेच्या विविध पैलूंमधील संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय नवीकरणीय ऊर्जा संशोधन आणि तंत्रज्ञान विकास कार्यक्रम राबवत आहे. हायड्रोजन आणि इंधन सेलवर चालू असलेले संशोधन आणि विकास प्रकल्प खालीलप्रमाणे आहेत:-
- भारतीय विज्ञान संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) बंगलोरने जीवाश्मवायू प्रक्रीयेद्वारे उच्च दर्जाच्या शुद्ध हायड्रोजन निर्मितीसाठी उत्पादन प्रकल्प स्थापन केला आहे.
- एआरसीआय सेंटर फॉर फ्युएल सेल टेक्नॉलॉजीज, चेन्नई 20 केव्ही पीईएम इंधन सेल साठा तयार करण्यासाठी एकात्मिक स्वयंचलित उत्पादन क्षमतेची स्थापना करत आहे.
- दयालबाग शैक्षणिक संस्थेने पाण्याचे फोटो इलेक्ट्रोकेमिकल विभाजनाद्वारे हायड्रोजन उत्पादनासाठी नवीन साहित्य विकसित केले आहे. 2021 मध्ये प्रकल्पांतर्गत विकसित केलेल्या साहित्यासाठी दोन पेटंट मंजूर करण्यात आले.
- राष्ट्रीय सौरउर्जा संस्था ( नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलर एनर्जी), गुडगावने, हायड्रोजन उर्जेवर उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याच्या प्रकल्पांतर्गत, हायड्रोजन इंधनावरील वाहनांसह विविध अनुप्रयोगांचे प्रदर्शन करण्यासाठी हरीत हायड्रोजन उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी इलेक्ट्रोलायझर आणि इतर उपकरणे खरेदी केली आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
Jaydevi PS/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1796855)
Visitor Counter : 303