आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशात डिजिटल आरोग्य सेवांमध्ये वृध्दी

Posted On: 08 FEB 2022 2:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 फेब्रुवारी 2022

 

केंद्र सरकारने देशभरात आरोग्य सेवा वितरण प्रणाली मजबूत करण्यासाठी डिजिटल आरोग्यसेवा देण्याची  क्षमता ओळखली आहे. या दिशेने डिजिटल आरोग्य उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी विविध योजना/उपक्रम  सुरू केले आहेत.

आरोग्य क्षेत्रात डिजिटल आरोग्य तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसाठी सक्षम वातावरण निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मोहीम सुरू करण्यात आली आहे.आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM)अंतर्गत, आरोग्य ओळखपत्र (हेल्थ आयडी), वैद्यकीय व्यावसायिक  नोंदणी(हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्री ,HPR), आरोग्य सुविधा नोंदणी ( हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री ,HFR) आणि माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी डिजिटल पायाभूत सुविधा या तीन प्रमुख नोंदणी आस्थापना विकसित केल्या गेल्या आहेत. आयुष्मान भारत डिजिटल मिशन(ABDM) याअंतर्गत स्थापन केलेल्या  या डिजिटल आरोग्य परिसंस्था या जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीय स्तरावरील सुविधांमध्ये सातत्याने  माहितीचे आदानप्रदान सुनिश्चित करत असते. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी परवडणारा आणि कमी खर्च,चाचण्यांची कमीवेळा पुनरावृत्ती, अचूक औषध, व्यक्तिसापेक्ष उपचार योजना आणि सर्व  व्यवस्थेमधील सेवेची गुणवत्ता यांचा लाभ नागरिकांना होत आहे.

नागरिकांना कोविड तसेच गैर-कोविड आजारांसाठी मोफत दूर आरोग्य सल्ला  सेवा प्रदान करण्यासाठी ,भारत सरकारने देखील सक्रियपणे ई-संजीवनी टेलिमेडिसीन प्लॅटफॉर्म लागू केले आहे.  ही  व्यवस्था  36 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधून कार्यान्वित  झाली आहे आणि आरोग्य आणि निरामय जीवन केंद्रे  (हेल्थ अँड वेलनेस सेंटर्स ,HWCs) यामधून मध्ये हब आणि स्पोक मॉडेलद्वारे सल्लामसलत करण्यासोबतच नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने सल्लामसलत डॉक्टर/तज्ञ वैद्यकीय सेवा प्रदान केली जात आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी राज्यसभेत आज एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1796479) Visitor Counter : 184