निती आयोग
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते नीती आयोगाच्या फीन-टेक खुल्या शिखर परिषदेचा शुभारंभ
प्रविष्टि तिथि:
07 FEB 2022 5:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी 2022
फीन-टेक म्हणजेच, वित्त-तंत्रज्ञान उद्योगाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी, नीती आयोगाने फोन पे, ए डब्ल्यू एस आणि ईवाय यांच्या सहकार्याने, एका तीन दिवसीय आभासी परिषदेचे आयोजन केले आहे. केंद्रीय रेल्वे, दूरसंवाद आणि इलेक्ट्रॉनिक्स तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या परिषदेचे उद्घाटन झाले. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ राजीव कुमार यावेळी उपस्थित होते. त्यांचे संपूर्ण भाषण या लिंकवर पाहता येईल:

या परिषदेदरम्यान होणारे सर्व कार्यक्रम, इथे बघता येतील:

अशाप्रकारच्या या पहिल्याच, खुल्या परिषदेत फीन-टेक ओपनमध्ये, सर्व नियामक, या क्षेत्रातील व्यावसायिक, उद्योगक्षेत्रातील प्रमुख उद्योजक, स्टार्ट अप क्षेत्रातील व्यावसायिक आणि विकासक सगळे एकाच व्यासपीठावर येऊन, आपापल्या कल्पना आणि अभिनव प्रयोगांचे आदानप्रदान करतील.
या परिषदेचा शुभारंभ करतांना, अश्विनी वैष्णव म्हणाले की, “ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, देशात, आरोग्य, लॉजिस्टीक विकास यांसारख्या इतर क्षेत्रांसाठी, कोविन आणि युपीआय सारखे मुक्त प्लॅटफॉर्म आम्ही विकसित करत आहोत. जनतेच्या सहभाग आणि गुंतवणुकीतून असे खुले प्लॅटफॉर्म तयार केले जाऊ शकतात. तसेच, अनेक खाजगी उद्योजक, स्टार्ट अप्स आणि विकासक देखील अशा प्लॅटफॉर्ममध्ये सहभागी होऊन नव्यानव्या संकल्पना सुचवू शकतात.”
नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ राजीव कुमार म्हणाले, “भारतात आज डिजिटल व्यवहारात लक्षणीय वाढ होत आहे तसेच, लोकांना अधिकाधिक स्वरूपात आणि सुलभरित्या वित्तीय सेवा उपलब्ध होत आहेत. यामुळे, लोकांच्या वित्तीय व्यवहाराच्या सवयी बदलल्या आहेत. आता लोक रोख व्यवहारांच्या ऐवजी, ई-वॉलेट आणि युपीआय या डिजिटल साधनांचा वापर करु शकतो. देशातील आर्थिक व्यवहारांचे स्वरुप अधिकाधिक समान, समृद्ध आणि सर्वसमावेशक करण्यासाठी, डिजिटल पेमेंट व्यवहार अतिशय महत्वाचे ठरणार आहेत. त्यादृष्टीने, फीनटेक मध्ये झालेली वाढ, देशाच्या वित्तीय सर्वसमावेशकतेला अधिक गती देणारी ठरली आहे.
फीनटेक ओपनचा उद्देश, सर्व बाजूंनी शिक्षण देणारा अनुभव देणे हा आहे. त्याची तीन उद्दिष्टे आहेत:
- संपूर्ण फीनटेक उद्योगक्षेत्रात एक मुक्त व्यवस्था निर्माण होण्यास प्रोत्साहन देणे.
- नवोन्मेष आणि विकासाला चालना देणे
- वित्तीय सर्वसमावेशकता सुनिश्चित करत अकाऊंट अग्रिगेटर सारख्या नव्या मॉडेल्सचा लाभ घेणे ज्यातून फीनटेकच्या क्षेत्रात, संशोधनांची नवी लाट येण्यास अनुकूल वातावरण निर्माण होईल.
या शिखर परिषदेत, सखोल चर्चासत्रे, वेबिनार्स, गोलमेज चर्चासत्रे, इत्यादि होणार आहेत. यातून,विविध स्टार्ट अप्स समोर असलेली, या क्षेत्रातील अभिनवता आणि आव्हाने यावर चर्चा होईल.त्याशिवाय,फीनटेक शी संबंधित कामे देखील यात दाखवली जातील. सर्वोत्तम अभिनव कल्पना राबवणाऱ्या फीनटेकचा आभासी माध्यमातून विशेष सत्कार देखील यावेळी केला जाईल.
फोनपेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समीर निगम यासंदर्भात म्हणाले, “भारताच्या अर्थ-तंत्रज्ञान क्रांतीला बळ देणाऱ्या या पुढाकारात नीती आयोगासोबत भागीदारी करत असल्याचा आम्हाला आनंद आहे.
या शिखर परिषदेतील ठळक गोष्ट म्हणजे भारताचा आजवरचा सर्वात मोठा अर्थ-तंत्रज्ञान हॅकॅथॉन. यात तरुणांना आणि स्टार्टअप समुदायाला वास्तविक जगाच्या समस्या सोडविण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना सदर करण्याची संधी मिळेल. त्या सोबतच, मुलांमध्ये सर्जनशीलता, नवोन्मेश आणि उद्योजक मानसिकता रुजविण्यासाठी शाळकरी मुलांसाठी अटल नवोन्मेश मिशनच्या अटल टिंकरिंग प्रयोगशाळा नेटवर्कच्या माध्यमातून विशेष हॅकॅथॉन देखील आयोजित केला जाईल
Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1796209)
आगंतुक पटल : 236