आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 169.46 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


गेल्या 24 तासात लसीच्या 45 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

कोरोनामुक्तीचा दर सध्या 95.91%

गेल्या 24 तासात 1,07,474 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 12,25,011

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 10.20%

Posted On: 06 FEB 2022 2:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2022

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार, गेल्या 24 तासांत लसीच्या  45  लाखांहून अधिक (45,10,770) मात्रा देऊन भारतातील कोविड-19  प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 169.46 कोटी (1,69,46,26,697 ) मात्रांचा टप्पा पार केला आहे.

1,87,79,150 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या.आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,03,97,677

2nd Dose

99,00,833

Precaution Dose

36,48,595

FLWs

1st Dose

1,84,01,238

2nd Dose

1,73,13,939

Precaution Dose

46,92,423

Age Group 15-18 years

1st Dose

4,92,84,464

2nd Dose

56,62,424

Age Group 18-44 years

1st Dose

54,46,63,377

2nd Dose

41,56,19,074

Age Group 45-59 years

1st Dose

20,09,69,761

2nd Dose

17,39,45,069

Over 60 years

1st Dose

12,53,66,811

2nd Dose

10,83,74,356

Precaution Dose

63,86,656

Precaution Dose

1,47,27,674

Total

1,69,46,26,697

 

गेल्या 24 तासांत 2,13,246  कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून )  4,04,61,148 झाली आहे.

परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा दर 95.91% इतका आहे.

गेल्या 24 तासात 1,07,474  नव्या  कोरोना रुग्णांची नोंद झाली.

भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 12,25,011 आहे.देशात आढळलेल्या  एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी  उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण   2.90% आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे.गेल्या 24 तासात एकूण 14,48,513  चाचण्या करण्यात आल्या.भारताने आतापर्यंत एकूण  74.01 कोटींपेक्षा जास्त  ((74,01,87,141)  चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या  10.20% आहे आणि  दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील 7.42% नोंदविण्यात आला आहे.

 

N.Chitale/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1795933) Visitor Counter : 209